विसर्जनाला जलप्रदूषण रोखा; पंतप्रधानांचं गणेशभक्तांना आवाहन

JPN NEWS

मुंबई - गणेश विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण रोखा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशभक्तांना केलं आहे. मुंबईत मेट्रो प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पार पडला. यावेळी ते बोलत होते.

कोणतंही सामान समुद्रात जाणार नाही ज्यामुळे जल प्रदूषण वाढीस लागेल. जलप्रदूषण वाढू शकतं असं कोणतीही सामुग्री पाण्यात जाऊ नये याची काळजी घ्या, असं मोदी म्हणाले. बाप्पाला निरोप देताना खूप सारं प्लास्टिक आणि इतर कचरा समुद्रात फेकला जातो. यावेळी हा प्रयत्न करा की असं कोणतंही सामान समुद्रात फेकू नका, असंही ते म्हणाले. दरम्यान, आपल्या भाषणाची सुरूवात मोदींनी मराठीत केली आणि गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !