भायखळा आणि धारावीत 63 लाख रूपये संशयीत रक्कम पकडली - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

11 October 2019

भायखळा आणि धारावीत 63 लाख रूपये संशयीत रक्कम पकडली


मुंबई - मुंबई शहर जिल्ह्यात भायखळा भागात काल सायंकाळी निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाद्वारे 58 लाख 58 हजार 15 रुपये इतकी संशयीत रक्कम पकडली. तर धारावी भागात आज सकाळी 4 लाख 51 हजार 740 रुपये अशी एकुण 63 लाख 9 हजार 755 रक्कम आढळून आली.

भायखळा विधानसभा मतदार संघात के.के.टॉवरच्या समोर, के.के.रोड, भायखळा (पश्चिम) येथे काल सायंकाळी मोटार क्र.MH.-46, BF-9849 पांढऱ्या रंगाची बोलेरो वाहनाची निवडणूक आयोगाच्या स्थिर तपासणी पथकाद्वारे तपासणी केली असता 58 लाख 58 हजार 15 रुपये इतकी संशयीत रक्कम आढळून आली. ही रक्कम अग्री पाडा पोलीस स्टेशन येथे जमा केली असून मुंबई आयकर विभागाचे अतिरिक्त संचालक यांना पुढील कार्यवाहीस्तव कळविण्यात आले आहे. अशी माहिती 184-भायखळा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दिपक क्षीरसागर यांनी दिली आहे.

धारावीत 4 लाख 51 हजार 740 रुपये संशयीत रक्कम पकडली -
आज सायन जंक्शन कडून एलबीएस रोडने कुर्ल्याच्या दिशेने जाणारे वाहन क्र. MH-01, BK-1961 होंडा सिटी कार या वाहनाची तपासणी केला असता वाहनामध्ये ही रक्कम आढळून आली. याबाबत धारावी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस डायरी क्र.25/2019, दिनांक 11/10/2019 अन्वये नोंद घेण्यात आली आहे. अशी माहिती 178-धारावी (अ.जा.) विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रविंद्र हजारे यांनी दिली आहे.

Post Top Ad

test