मुंबईत २४ तासांत पावसाची शक्यता - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

01 November 2019

मुंबईत २४ तासांत पावसाची शक्यता


मुंबई - नोव्हेंबर महिना सुरु झाला असून उन्हाच्या झळाने मुंबईकर घामाच्या धारांनी चिंब झाले असतानाच शुक्रवारी मुंबई व उपनगरांत पडलेल्या अवकाळी पावसाने चांगलेच झोडपून काढले. संध्याकाळी पाच नंतर अचानक पाऊस कोसळल्याने घरी परतणा-या चाकरमान्यांची तारांबळ उडाली. अवकाळी पावसाचा हवेतही गारवा निर्माण झाला होता. दरम्यान येत्या २४ तासांत पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अधून मधून पडणा-या पावसाने ऑक्टोबर हिटही मुंबईकरांना जाणवला नाही. नोव्हेंबर महिना सुरू झाला असतानाही शुक्रवारी मुंबई उपनगरांत जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक पाऊस कोसळल्याने घरी परतणा-या मुंबईकरांची धावपळ उडाली. छत्र्या नसल्याने अनेकांना भिजतच रेल्वे, बसस्थानक गाठावे लागले. जवळपास तास- दीड तास पडलेल्या पावसाने मुंबईकरांना चिंब केले. भांडुप, मुलुंड, चेंबूर, वांद्रे, दादर, सीएसटी, चर्चगेट, वरळी, दादर, आदी भागात पाऊस कोसळला. दरम्यान गोवा, कर्नाटक लगत समुद्रामध्ये ‘महा’ वादळामुळे पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘महा’ हे वादळ ४० ते ६० किलोमीटरच्या गतीने उत्तरेकडे सरकत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर ८ ते १२ फूट उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या २४ तासांत मुंबई, ठाणे आदी भागात पावसाची शक्यता आहे. समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनी सावध राहण्याची सूचनाही स्कायमेटने दिली आहे.

Post Top Ad

test