Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मुंबई महापालिकेत 299 कोटींचा घोटाळा


नागपूर दिनांक 18 डिसेंबर - मुंबई महापालिकेत 290 रस्त्यांसाठी तब्बल 836 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले असून 40 टक्के जादा दराने हे कंत्राट देण्यात आले आहे. यामध्ये 299 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप माजी शालेय शिक्षणमंत्री आमदार अॅड. आशिष शेलार यांनी विधानसभेत आज केला. त्याच वेळी मराठा आणि कुणबी समाजासाठी स्थापन झालेल्या ‘सारथी’ चे अनुदान बंद करून ही संस्था बंद करण्याचा घाट नव्या सरकारकडून घातला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

विधानसभेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करत असताना राज्यपालांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्याला विरोध करताना आमदार आशीष शेलार यांनी राज्यातील बिघडलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. ज्या ठाणे शहरातून राज्याचे गृहमंत्री आले आहेत त्या ठाणे शहरात एका आठवड्यात चार मुलींचे अपहरण झाल्याची घटना घडली तर नालासोपारा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार, बापाचा निर्घुण खून केल्याची घटना वाकोला येथे घडली, तर कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर एका बॅगेत मृतदेह सापडला तो खूनही बावीस वर्षीय मुलीचा बापाने केल्याचे उघड झाले. तर पोलिसांनी मारलेल्या छाप्यामध्ये ५ कोटी ६० लाख रुपयांचा एमडी ड्रगचा साठा हस्तगत करण्यात आला. चुनाभट्टी येथे हिट अँड रन प्रकरणांमध्ये अर्चना पारटे या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याशिवाय जळगाव जमूद खेर्डा येथे दिव्यांग मुलीची हत्या करण्यात आली तर अमेरिकेतून भारतात सुट्टीसाठी आलेल्या सुनेची हत्या वसईमध्ये घडली, तसेच नालासोपारा येथे ८ वी मध्ये शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करण्यात आला अशा राज्यातील अनेक घटनांचे उल्लेख करत आशिष शेलार यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्ण बिघडली असून तातडीने या गोष्टींकडे सरकारने लक्ष द्यावे अशी मागणी केली. ज्या राज्यात महिला सुरक्षित नाही त्या राज्यात राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव आल्यावर आम्ही त्याला पाठिंबा कसा देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. उल्हासनगर येथील 32 वर्षीय प्रियांका गुप्ता या महिलेने रात्री उशिरापर्यंत ज्युस सेंटर सुरू ठेवले म्हणून तिच्या पतीला आणि तिला अटक करण्यात आली पोलिसांकडून वीस हजार रुपयांचा हप्ता मागविण्यात आला आणि या प्रकरणाचा न्याय मागण्यासाठी प्रियांका गुप्ता या महिलेला मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारावी लागली. अशी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची बिघडलेली परिस्थिती मांडत आमदार आशिष शेलार यांनी लक्ष वेधले. राज्यपालांचे अभिभाषण मध्ये सर्व समाजाच्या लोकांना न्याय देणार असा मुद्दा मांडला आहे. मात्र भाजप सरकारच्या काळात मराठा समाजच्या मोर्चा नंतर सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या सारथी या संस्थेला यापुढे एक रुपयाही दिला जाणार नाही असा जीआर ६ डिसेंबर रोजी काढून या सरकारने ही संस्था जणू बंद करण्याचा घाट घातला असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

तसेच या सरकारच्या काळात नुकताच झालेला घोटाळा उघड करताना त्यांनी सांगितले की मुंबईतील 415 रस्त्यांच्या कामासाठी 862 कोटीची निविदा मुंबई महापालिकेकडून मागवण्यात आली पण मागे घेऊन त्यापैकी 290 रस्त्यांच्या रस्त्यांची कामे अंदाजे 836 कोटीला म्हणजेच अधिक 40 टक्के दराने देण्‍यात येणार यामध्ये 299 कोटीचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. राज्यपालांचे अभिभाषण यामध्ये गदिमा, पु. ल. देशपांडे आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रम घेणार असे सांगण्यात आले असले तरी मराठीच्या पाठ्यपुस्तकात लेखक कवींची कविता घेतल्या जातात त्यांना केवळ पाच हजार रुपये सात वर्षांसाठी म्हणजेच महिन्याला ६० रुपये मानधन दिले जाते ही बाब सुद्धा चिंताजनक याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom