शिवाजीपार्क आता 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' - नामविस्तार ठराव मंजूर - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 March 2020

शिवाजीपार्क आता 'छत्रपती शिवाजी महाराज पार्क' - नामविस्तार ठराव मंजूर


मुंबई -- ज्या मैदानावर सचिन तेंडुलकरसारखे खेळाडू घडले, राजकीय सभा गाजतात अशा प्रसिद्ध शिवाजी पार्कचे आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे नामविस्तार झाले आहे. सन १९२७ चा ठराव रिओपन करून बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका सभागृहात मांडला. या ठरावाला सर्वपक्षीयांनी पाठिंबा दिल्याने महापौर किशोरी पेडणेकर यांनी हा ठराव मंजूर झाल्याचे जाहिर केले. 

मुंबईतील दादर या मध्यवर्ती ठिकाणी असलेले शिवाजी पार्क हे मैदान लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे लोकप्रिय स्थळ आहे. १९२५ मध्ये मुंबई महानगर पालिकेने हे मैदान जनतेसाठी खुले केले. याचे मूळ नाव माहीम पार्क असे होते. या मैदानावर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा १९६६ मध्ये उभारण्यात आला. शिवाजी पार्कचा कट्टा तरुण मंडळींसाठी गप्पांची जागा, तर वयस्कर मंडळींसाठी सकाळ-संध्याकाळच्या फेरफटक्यानंतर विश्रांतीचा थांबा म्हणून प्रसिद्ध आहे. या परिसरात सावरकर स्मारक, उद्यान, गणेश मंदिर, शिवाजी पार्क जिमखाना, माहीम स्पोर्ट्‌स क्लब, समर्थ व्यायाम मंदिर, बालमोहन विद्यामंदिर आहे. या मैदानावर क्रिक्रेटर सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, प्रवीण आमरे, संदीप पाटील, किरण मोरे, संजय मांजरेकर आदी खेळाडू घडले आहेत. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे याच्या अनेक सभा याच मैदानावर गाजल्या आहेत. अजूनही येथे शिवसेनेकडून दसरा मेळावा आयोजित केला जातो. या मैदानाला शिवसेनेकडून शिवतीर्थ असेही म्हटले जाते. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी देशाच्या कानाकोप-यातून चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने येथे जनसागर लोटतो. त्यामुळे शिवाजी पार्कला विविध कारणाने महत्व आलेले आहे. याच शिवाजी पार्कच्या नामविस्ताराचा १० मे १९२७ रोजीचा ठराव होता. हा ठराव यशवंत जाधव यांनी रिओपन करुन सभागृहात मांडला. शिवाजी पार्कचे नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे करावे असा ठराव जाधव यांनी मांडला. याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिल्याने हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे शिवाजी पार्कचे आता नामविस्तार आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क असे झाले आहे

Post Bottom Ad