Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गोवंडी परिसरातील कोरोना रुग्ण वाऱ्यावर - माजी नगरसेवकाचा आरोप



मुंबई - मानखुर्द-शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 139 गोवंडी विभाग रेड झोन म्हणून घोषित आहे. करोनाने अनेकजण मृत्युमुखी पडले आहेत तर अनेकजण बाधित आहेत. दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही पालिकेकडून या भागात लक्ष दिले जात नसल्याचा आरोप येथील स्थानिक माजी नगरसेवक राजेंद्र वाघमारे यांनी केला आहे.यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांना पत्राद्वारे कळविले असल्याचे सांगितले.

मानखुर्द-शिवाजीनगर येथील पंचशील चाळीमध्ये 5 ते 6जण कोरोना पोसिटीव्ह आहेत.यामध्ये सूर्योदय सोसायटी येथे 1, बुद्धनगर येथे 4,भैय्यासाहेब आंबेडकरनगर 2,गायकवाडनगर चाळ क्रमांक 1 ते 25 येथे 5 तर सारनाथ टॉवर येथे 1 रुग्ण पोजिटिव्ह आहे.यामुळे हा संपूर्ण परिसर सील केलेला आहे.काहींना विलीगिकरन केले असून काही घरीच आहेत.सुमारे 6 ते 7 जण मृत झाले आहेत.त्यामुळे या विभागात भीतीचे वातावरण आहे.

पंचशील नगरमधील 25 ते 30 जणांना पालिकेच्या वतीने माहुल गाव येथे विलीगिकरन करण्यात आलेले आहे.मात्र या ठिकाणी साफसफाई नसून प्यानी मिळणेही कठीण झाले आहे.तसेच या लोकांना वेळेवर औषध ,उपचार मिळत नाही.सदर विभाग झोपडपट्टीचा असून येथे दुर्लक्ष झाले तर धारावीसारखी अवस्था होण्याची शक्यता आहे.

या विभागातील पंचशील नगर ,त्रिशरण चाळ, पल्लवी चाळीतील लोकांची त्वरित आरोग्य तपासणी व्हावी.येथील पोसिटीव्ह रुग्ण घरीच असून त्यांना रुग्णालयात हलवावे,माहुलगाव , बीएआरसी, शिवाजीनगर येथील रुग्णांवर त्वरित उपचार व्हावेत अशी मागणी राजेंद्र वाघमारे यांनी केली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom