भारताने केला 123 देशांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 May 2020

भारताने केला 123 देशांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा
नवी दिल्ली, 5 मे - कोरोना संकटाच्या काळात भारताने 123 देशांना अत्यावश्यक औषधांचा पुरवठा केला आहे. यात अलिप्त राष्ट्र चळवळीतील 55 देशांचा समावेश आहे. अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. भारताही या औषधांची नितांत गरज आहे. मात्र आम्ही आपल्या नागरिकांसोबत जगातील नागरिकांचाही विचार केला. महामारीच्या या संकटातही अनेक देशांनी आपल्या अर्थव्यवस्थेला प्राधान्य दिले. पण आम्ही नागरिकांच्या आरोग्याचा विचार केला. असे पंतप्रधानांनी अलिप्त राष्ट्र चळवळीतील देशांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधताना सांगितले.

या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येण्याची गरज आहे. अनेक देश एकमेकांना सहकार्यही करीत आहेत. अनेक देशांकडे कोरोनावर मात करण्यासाठी औषध नव्हते. त्यांनी भारताकडे त्यांची मागणी केली आणि आम्हीही मागणीला मान देत. मानवतेच्या आधारावर हा पुरवठा केला. यासाठी अनेक देशांनी भारताचे आभारही मानले. भारत हा औषधांचा जागतिक कारखाना म्हणून ओळखला जात आहे, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानवरही अप्रत्यक्ष हल्ला केला. जगावर कोरोनाचे संकट असताना आमच्या शेजारील एक देश दहशतवाद आणि खोट्या बातम्या पसरविण्यावर भर देत आहे, अशी टीका त्यांनी केली.

Post Bottom Ad