
ज्याप्रकारे त्यांनी आपल्या वेब पेजवर किंवा मोबाइल अॅपवर भाषा निवडताना मराठी लवकरच आणत आहोत आणि आपण क्षमस्व आहोत असं त्यांनी टाकलं आहे. मराठीद्वेष दाखवला तेव्हाच आम्ही मनसैनिक अॅमेझॉनला सह्याद्रीचं पाणी पाजणार असं सांगितलं होतं. त्याचप्रकारे शुक्रवारी काही फटाके फुटले आणि अॅमेझॉन प्रशासन खडबडून जागं झालं,” असं अखिल चित्रे यांनी सांगितलं.