नववर्षाच्या पार्ट्या रात्री ११ च्या आत

Anonymous
0

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचे स्वागत केले जात आहे. हे नववर्ष सर्वसाधारण नसल्याने कोरोनासंदर्भातील नियमांचे पालन करत रात्री ११ वाजेपर्यंत पार्ट्या आटपून घ्या असे आवाहन मुंबई महापालिकेने मुंबईकरांना केले आहे. तसेच आज रात्री ११ नंतर दिड वाजेपर्यंत हॉटेल, रेस्टोरंटना होम डिलिव्हरी आणि पार्सल नेण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयाचे हॉटेल, रेस्टोरंटच्या आहार या संघटनेने स्वागत केले आहे. 

मुंबईत मार्च पासून कोरोना विषाणूचा प्रसार होत आहे. गेले दहा महिने पालिका, आरोग्य विभाग कोरोनाचा प्रसार रोखण्याचे काम करत आहेत. पालिका आणि आरोग्य विभागाच्या प्रयत्नामुळे कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. कोरोनाचा प्रसार कमी झाला असला तरी पूर्णपणे गेलेला नाही. गर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होत असल्याने पालिकेने वेळोवेळी गर्दी करू नका, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका असे आवाहन केले आहे. त्यानंतरही मुंबईत नाईट क्लब, पबमध्ये गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने यंदा नववर्षाचे स्वागत करताना रात्री ११ च्या आता करावे. घरातूनच नव वर्षाचे स्वागत करा असे आवाहन केले आहे. चौपाट्या आणि गर्दी होणाऱ्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्या असे आवाहन पालिकेने केले आहे. 

नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी रात्री पार्ट्या आयोजित केल्या जातात. घरातही हॉटेलमधील जेवण मागवले जाते. सरकार आणि पालिकेने रात्री ११ पर्यंत हॉटेल सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. रात्री ११ नंतर हॉटेल सुरु ठेवता यावे, होम डिलेव्हरी करता यावी म्हणून आम्ही सरकार आणि पालिकेकडे मागणी केली होती. या मागणीचा विचार करून पालिकेचे अतिरक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रात्री ११ नंतर दिड वाजेपर्यंत होम डिलिव्हरी आणि पार्सलसाठी परवानगी दिल्याची माहिती हॉटेल रेस्टोरंटच्या 'आहार' संघटनेचे सुधाकर शेट्टी यांनी दिली. रात्री ११ नंतर पार्सल मिळणार असल्याने तसेच होम डिलिव्हरी मिळणार असल्याने त्याचा फायदा ग्राहकांना होणार आहे असे शेट्टी यांनी सांगितले.  
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)