Type Here to Get Search Results !

मुंबई गारठणारमुंबई - राज्यात गेल्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. पण ढगाळ वातावरणामुळे गायब झालेली थंडी आता परत आली आहे. मुंबईसह, पुण्यात थंढीचा कडाका वाढायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्यात पावसानं चांगलीच हजेरी लावली होती. यामुळे हवेतीला गारवा आणखी वाढला आहे. ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी झाला होता. मात्र, आता शहरात किमान तापमानात हळूहळू घट व्हायला सुरुवात झाली आहे. तर पुढच्या दोन दिवसांत थंडीचा पारा आणखी वाढेन असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

आज शहरात सकाळी 17 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. हलक्या प्रमाणात धूक्याची चादर पहायला मिळाली. पुढील काही दिवसात जोराची थंडी अनुभवायला मिळेल असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे. मात्र, मैदानावर व्यायाम करण्यासाठी पुणेकरांनी गर्दी केली आहे. मैदानाला फेरफटका मारत चालत पुणेकर थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत. खरंतर, मागच्या आठवड्यात राज्यभर पाऊस झाल्यामुळे मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भात गारठा वाढण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील अनेक भागांत पहाटे दाट धुकं पडल्याचं पाहायला मिळालं. येत्या दोन ते तीन दिवसांत मराठवाड्यासह, विदर्भातील अनेक भागांत गारठा वाढणार आहे. गुरुवारी (ता. 17) सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यात सर्वांत कमी किमान तापमान परभणी इथं 14.9 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad