औरंगजेब 'सेक्युलर' नव्हता, अजेंड्यातील सेक्युलरमध्ये औरंगजेब बसत नाही - मुख्यमंत्री

Anonymous
0

मुंबई - औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा वाद वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे अजेंड्यातील 'सेक्युलर'मध्ये औरंगजेब बसत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे. यावरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नामांतरावरून होणारा वाद कमी होताना दिसत नाही.

नाशिक येथील माजी आमदार वसंत गीते आणि सुनील बागुल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पुर्नप्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटरवर औरंगाबादच्या नाव संभाजीनगर उल्लेख होत असल्याबाबत विचारले असता, ट्विटरवर जे केले त्यात नवीन काय केले मी. शिवसेना प्रमुखही संभाजीनगर बोलत होते. तेच मीही करत आहे. यात वेगळे असे काही नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.

वसंत गिते व सुनिल बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबाबत बोलताना, मला नाही वाटत त्यांनी केवळ नाशिक महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केला आहे. आमचेच लोक आहेत, शिवसैनिक परत आलेत, अनुभव घेऊन अनुभवसमृद्ध होऊन ते परत आलेत. नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच, मात्र आता जुनी नवी मंडळी एकत्र येत ताकदीने भगवा फडकवतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. अजून कोरोना धोका आहेच. मी कोयना प्रकल्प, समृद्धी महामार्ग, गोसीखुर्द या सर्व प्रकल्पांची पाहणी केली. प्रकल्पांना गती दिली पाहिजे म्हणून दौरे करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

वसंत गिते व सुनिल बागुल यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याबाबत बोलताना, मला नाही वाटत त्यांनी केवळ नाशिक महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रवेश केला आहे. आमचेच लोक आहेत, शिवसैनिक परत आलेत, अनुभव घेऊन अनुभवसमृद्ध होऊन ते परत आलेत. नाशिक शिवसेनेचा बालेकिल्ला आहेच, मात्र आता जुनी नवी मंडळी एकत्र येत ताकदीने भगवा फडकवतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)