गोरेगाव नेस्को कोविड सेंटरमधील नर्सेसचे आंदोलन

0


मुंबई - गोरेगाव नेस्को कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या नर्सेसना सुविधा मिळत नसल्याने येथील नर्सेस आणि डॉक्टरांनी रविवारी आंदोलन केले. आंदोलनात नेस्को कोविड सेंटरच्या नर्सेस व डॉक्टरांनी सहभाग घेतला. नेस्को कोविड सेंटरमधील नर्स आणि डॉक्टरांना राहण्यासह खाण्या-पिण्याच्या प्राथमिक गरजा पूर्ण व्हाव्यात अशी मागणी त्यांची आहे. दरम्यान, प्रशासनाने मागण्यांबाबत निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.

कोविड सेंटरमध्ये आवश्यक सुविधा मिळत नाहीत, याबाबत येथील कोरोना योद्ध्यांनी गोरेगाव नेस्को कोविड सेंटर वरिष्ठांकडे तक्रार देखील केली होती, मात्र तक्रार करुनही कोणतीही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली होती. या आंदोलनाची येथील प्रशासनाने दखल घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र तोंडी आश्वासन नको, लेखी द्या यावर आंदोलक ठाम राहिले. अखेर प्रशासनाने लेखी पत्र दिल्याने आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

येथील नर्सेसच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. तसे लेखी पत्रही प्रशासनाकडून देण्यात आले आहे. त्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. त्यांचा प्रश्न सोडवला जाईल.
डॉ. निलम अंद्राडे, अधिष्ठाता
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)