Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पालिकेची टीम रायगड, कोल्हापुरात दाखल


मुंबई - आपत्कालीन प्रसंगी मदत कार्यासाठी तत्पर असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या दोन टीम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रायगड व कोल्हापूरला दाखल झाल्या आहेत. आरोग्य व घनकचरा विभागातील ७५ कर्मचारी आवश्यक यंत्र सामुग्रीसह मदतकार्य सुरू केले आहे. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू आणि सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी कार्यरत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
 
मुंबई महानगरपालिकेचा एक चमू रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदत कार्य करण्यास रवाना झाला आहे. यामध्ये १ फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे ७५ कर्मचारी, पाण्याचे ४ टँकर, १ टोइंग लाॅरी इत्यादींचा समावेश आहे. याबाबत वैद्यकीय विषयक बाबींचे व्यवस्थापन हे महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.मोहन जोशी तर आपत्कालीन व्यवस्थापन विषयक कार्यवाही महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करीत आहेत.

कोल्हापूर येथील पूर बाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्या संबंधित मदतीसाठी महानगरपालिकेची दुसरी टीमही कोल्हापूरात पोहचली आहे. संबंधित कर्मचाऱ्यांच्या चमुसोबत 'रिसायकल मशीन' आणि इतर आवश्यक यंत्रसामग्री देखील पाठविण्यात आली आहे. महापालिकेची यंत्रणा वापरत असताना यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप मुख्य अभियंता सुनील सरदार यांचीही मदत घेण्यात येत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

सन २०१९ मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे नागरी सेवा सुविधेसह दाखल होऊन महानगरपालिकेच्या कर्मचारयांनी अहोरात्र मेहनत घेत मदतकार्य सुरू ठेवले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom