Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

माझा देश हाच धर्म, हेच आमचं हिंदुत्व - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात भाजपावर जोरदार हल्ला चढवला. धर्माचा अभिमान असला पाहिजे. धर्म पाळला पाहिजे. पण प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायचा, घराबाहेर पाऊल टाकतो हा माझा देश हा धर्म असलाच पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. आमचं हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व आहे. असे म्हणत भाजपाला हिंदुत्वावरून टोला लगावला. तसेच मुख्यमंत्री म्हणून मी तुम्हाला कधी वाटू नये, मी तुमच्या घरातलाच आहे. हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला हाणला. काही जण मी पुन्हा येणार म्हणून गेले, ते आता बसले आहेत असाही चिमटा त्यांनी काढला. सत्ता, पद यापलीकडे जनतेचा आशीर्वाद हीच आमची शिवसेनेची ताकद आहे, असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाला सुरूवात झाल्यानंतर शिवसैनिकांनी घोषणा द्यायला सुरूवात केली. शिवसेना पक्ष म्हणून आपला आवाज कोणी दाबू शकत नाही, कोणीही जन्माला आलेला नाही. शस्त्रपूजन केल्यावर खऱ्या शस्त्रांवर फुले उधळली हेच प्रेम प्रत्येक जन्मी मिळो हीच माझी प्रार्थना आहे. माझा कुटूंब माझा परिवार हीच शस्त्रे बाळासाहेबांनी दिली आहेत. मी मुख्यमंत्री आहे, हे कधीही वाटू नये. मी तुमच्या घरातला आहे हे वाटो, ही इश्वर चरणी प्रार्थना आहे. जे बोलत होते, मी पुन्हा येईन म्हणणारे ते आता बसले आहेत. जे संस्कार, संस्कृती बाळासाहेबांनी दिले, मा साहेबांनी दिले. पदे काय आहेत, पदे येतील जातील, सरकार असेल पुन्हा येईल आणि जाईलही पुन्हा येईल. मी कुणीतरी आहे, अहमपणा जायला हवा. ज्या क्षणी हवा जाईल, तेव्हा जनता स्विकारेल. म्हणूनच मी जनतेशी नम्रतेने वागतो. कारण आशीर्वाद हीच आमची ताकद आहे, हेच वैभव आहे.

जनतेचा आशीर्वाद हीच ताकद आहे, ती कमावण्याची परंपरा शिवसेनेला मिळालेली आहे. मनात विषयांची गर्दी आहे. गर्दीत विचारांना विचारू शकत नाही की वॅक्सीन घेतली का ? विचारांना मास्क कसा घालणार ? माझ्या भाषणानंतर कधी चिरकायला मिळतय, कधी आम्ही चिरकतोय हेच काही जणांचे काम आहे. त्यांना उत्तर देण्यासाठी बोलत नाही मी जनतेसाठी बोतो आहे. पण हल्ली विकृती आली आहे, हे चिरकणे आहे. ठाकरे कुटूंबावर हल्ला करणे काहींचे कामच झाले आहे. पण ठाकरे कुटूंबावर हल्ला करणारा जन्माला आलेला नाही. ठाकरे कुटूंबावर हल्ले करायचे, हे रोजगारी हमीचे काम काही जणांचे झाले आहे. किती पैसा तुम्हाला मिळतो आहे, की तुम्ही चिरकत रहा. पण माझा वाडा चिरेबंदी वेगळ्या प्रकाराने प्रयत्न केला तरीही भेदता येणार नाही. ठाकरे कुटूंबावर हल्ला करणारा अजून जन्माला आलेले नाहीत.

ही काय लायकीची माणसं आहेत, ते आपल्या अंगावर येत आहेत. आव्हान देत आहेत, हिंमत असेल तर अंगावर या. मी कशाला येऊ तुमच्या अंगावर? आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. पण कुणी आलं तर आम्ही सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावर? काय आहे तसं? लायकी तरी आहे का, पात्रता तरी आहे का? हीच शिकवण आम्हाला शिवरायांनी, शिवसेना प्रमुखांनी दिली आहे. पण अंगावर यायची भाषा करत असाल तर स्वत: मध्ये हिंमत आणि धमक असेल तर द्या. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून देऊ नका. मी सुद्धा पक्षप्रमुख म्हणून आज आव्हान द्यायतं असेल तर माझ्या या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून आणि त्यांच्या ताकदवर देईन. मुख्यमंत्री म्हणून देणार नाही. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं, याला नामार्द म्हणतात.

आज दोन मेळावे असतात. एक आपला आणि दुसरा आरएसएसचा. आपले विचार एक आहेत. पण धारा वेगळ्या असू शकतात. विचार एक होत्या, आहेत म्हणूनच भाजपसोबत युती केली होती. ज्यांना अजूनही वाटतं ते मुख्यमंत्री राहिले असते, कदाचित राहिले असते. जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर तुम्हीसुद्धा आज नाहीतर उद्या मुख्यमंत्री राहिले असता. पण नशिबात नव्हतं म्हणून तुम्ही वचन तोडलंत. मी हे पद स्वीकारलं ते एका जबाबदारीने स्वीकारलं. मी केवळ माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं. शिवेसेना प्रमुखांना दिलेलं वचन, तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करुन दाखवेल, खरंतर ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही. पण ते वचन मी पूर्ण करुन दाखवेलंच. ही जबाबदारी मी मोठ्या विचाराने घेतलेली आहे. कदाचित दिलेलं वचन त्यांनी पाळलं असतं शिवसैनिक मुख्यमंत्री केली असती तर मी या राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. हे क्षेत्र माझं नाही, अशी माझ्यावर टीका होते. हो हे माझं क्षेत्र नाही. मी एक पूत्र कर्तव्य निभावण्यासाठी या क्षेत्रात आलो आहे. आणि पाय रोवून ठाम पणाने उभा राहिलो आहे. जी जबाबदारी खांद्यावर आहे ती ठामपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या जबाबदारीने मी उभा राहिलेलो आहे.

हे काही थोडांत नाही की, मैं तो फकीर हुँ, झोली पहनके, ये झोलीबीली असे कर्मदरिद्री आमचे विचार नाहीयत. हे विचार आमचे नाहीत. सकाळी आरएसएसचा मेळावा झाला. हिंदूत्व ही विचारधारा आपल्या दोघांमध्ये समान आहे. हिंदूत्व म्हणजे काय? मला मोहनजींना सांगायचं आहे की, मी जे बोलणार आहे ते कृपा करुन मी तुमच्यावर टीका केली असं मानू नका. पण तुम्ही जे काही सांगत आहात किंवा मी जे काही सांगतोय ते आपलीच माणसं ऐकत नसतील तर या मेळाव्यांची थेरं करायची तरी कशाला? गेल्यावर्षीही मोहनजींनी जे सांगितलं होतं हिंदूत्व म्हणजे काय? मी आणले आहेत त्यांचे वाक्य.

एक मुद्दा मी स्पष्ट करु इच्छितो, आमचं हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकवेळा सांगितलं आहे, पहिल्यांदा आपण माणूस म्हणून जन्माला येतो. जात-पात, धर्म हा नंतर चिकटतो. मग काय करायच? धर्माचा अभिमान असला पाहिजे. धर्म पाळला पाहिजे. पण प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायचा, घराबाहेर पाऊल टाकतो हा माझा देश हा धर्म असलाच पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. हा विचार आमचा आहे. ही शिकवण आम्हाला दिलेली आहे. अशी शिकवण घेऊन आम्ही जेव्हा घराबाहेर पडतो, देश हा धर्म असं म्हणून वाटचाल करत असतो त्यावेळेला आमच्या वाटेत स्वत:च्या धर्माची मस्ती घेऊन कोणी अडथळा आणला तर मग आम्ही कडवट देशाअभिमानी, राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासोबत उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom