Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

नगरसेवकांच्या संख्येत वाढ, भाजपची टीका

 

मुंबई - मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या ९ ने वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या २२७ वरून २३६ झाली आहे. या निर्णयाचे मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केले आहे. तर राजकीय हेतून हा निर्णय घेतला असून सत्ताधारी शिवसेना निवडणुकीला घाबरला आहे अशी प्रतिक्रिया भाजपकडून देण्यात आली आहे.

राज्य सरकारने महापालिकेतील नगरसेवकांची संख्या वाढवली आहे. सरकारने फक्त ९ नगरसेवकच का वाढवले. नगरसेवकांची संख्या वाढवण्याला लोकसंख्येचा किंवा जणगणनेचा आधार आहे का असे प्रश्न भाजपचे नगरसेवक व प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी उपस्थित केले आहेत. केवळ राजकीय सोयीसाठी आणि तोंडावर आलेली निवडणूक पुढे ढकलण्यासाठी हा निर्णय शिवसेनेने घेतला आहे असा आरोप त्यांनी केला आहे. या आधी राज्यातील महापालिकेमधील १५ टक्के जागा वाढवल्या त्यावेळी मुंबई महापालिकेतील जागा वाढवल्या नव्हत्या. आधी या ज़ागा वाढवता आल्या असत्या, मात्र त्यावेळी या जागा वाढवल्या नाहीत. प्रभाग रचनेत बदल करून निवडणूक जिंकू असा डाव यशस्वी होणार नाही, हे लक्षात आल्यावर प्रभागांची संख्या वाढवल्यावर प्रभाग रचना करण्यास आपल्याला मोकळं रान मिळेल या राजकीय हेतून हा निर्णय घेण्यात आला आहे. ते निवडणुकीला घाबरले आहेत असा आरोप शिरसाट यांनी केला आहे. देशात जनगणना झाली नसताना लोकसंख्या कुठे वाढली, कुठे वॉर्ड वाढणार कुठे कमी होणार हे सरकारने सांगितलेले नाही. प्रशासनाला हाताशी धरून असुरक्षितता निर्माण झाली आहे. सत्ताधाऱ्यांना परबहाव दिसू लागला आहे. यासाठी ही नगरसेवकांची संख्या वाढवण्यात आली आहे. ज्या पद्धतीने कामकाज सुरु आहे यामुळे मुंबईकरांच्या मनात एक वेगळा संदेश गेला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण झाली आहे अशी प्रतिक्रिया भाजपचे पालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.   

إرسال تعليق

0 تعليقات
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom