Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

'म्हाडा'मध्ये संविधान दिनानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचनमुंबई, दि. २६ नोव्हेंबर, २०२१ : भारताच्या घटना परिषदेने देशाची राज्यघटना दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी देशाला अर्पण केली, या घटनेला ७२ वर्षे होत असल्याचे औचित्य साधत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आज संविधान दिन साजरा करण्यात आला. या निमित्ताने संविधानाच्या उद्देशिकेच्या (Preamble) सामुहिक वाचनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे सहमुख्य अधिकारी जीवन गलांडे, म्हाडाचे सचिव राजकुमार सागर आदींसह म्हाडातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाला पुष्पांजली अर्पण करण्यात आली.

भारतीय संविधान निर्मितीमधील संस्थापकांच्या योगदानाचा उचित सन्मान व्हावा म्हणून दिनांक २६ नोव्हेंबर हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा करण्यात येतो. जगातील सर्वोच्च ठरलेल्या भारताच्या संविधानाने देशातील प्रत्येक व्यक्तीला मान, सन्मान आणि समानतेचा हक्क दिला स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांवर आधारित भारताच्या संविधानाने देशाला एकजूट ठेवले असून सर्वधर्म समभावाची जोपासना केली आहे. म्हणूनच भारतीय संविधानाबाबत जनजागृती आणि सर्व नागरिकांना संविधानाची ओळख व्हावी, याकरिता राज्यात दरवर्षी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन केले जाते. याच पार्श्वभूमीवर आज हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक म्हाडा मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे प्रधान कार्यवाह एस. के. भंडारे यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Bottom