Lockdown राज्यात निर्बंध - सकाळी जमावबंदी, रात्री संचारबंदी

0


मुंबई - कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीची अंमलबजावणी १० जानेवारीपासून होणार आहे. तसेस हे निर्बंध १५ फेब्रुवारीपर्यंत लागू राहतील, असे राज्य सरकारने जाही केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

नव्या नियमावलीनुसार राज्यात सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी, रात्री ११ ते सकाळी ५ संचारबंदी लागू राहणार आहे. त्याबरोबरच सार्वजनिक प्रवासी वाहतुकीमधून प्रवास करण्यासाठी दोन डोस घेतलेले असणे अनिवार्य आहे.मात्र लोकल वाहतुकीवर कुठलेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाही. तसेच राज्यातील शाळा आणि महाविद्यालये हे १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

– राज्यात सकाळी ५ ते रात्री ११ पर्यंत जमावबंदी, रात्री ११ ते सकाळी ५ संचारबंदी
– शाळा महाविद्यालये १५ फेब्रुवारीपर्यंत बंद
– मैदाने, उद्याने, पर्यटनस्थळे पूर्णपणे बंद
– स्विमिंग पूल, जिम, स्पा पूर्णपणे बंद
– लोकल वाहतुकीवर कोणतेही निर्बंध नाहीत
– खासगी कार्यालयात २ डोस घेतलेल्यांनाच परवानगी
– २ डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक सेवेचा लाभ घेता येणार
– रेस्टॉरंट्स, नाट्यगृहे चित्रपटगृहे ५० टक्के क्षमतेनं रात्री १० पर्यंत सुरू
– लग्नाला ५०, तर अंत्यविधीला २० जणांनाच परवानगी
– सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त ५० लोकांची उपस्थिती

सरकारी कार्यालयांसाठी
– लेखी आणि स्पष्ट परवानगीशिवाय सरकारी कार्यालयात लोकांना प्रवेश नाही
– व्हिडीओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करुन नागरिकांशी संवाद राखणे
– एकाच कॅम्पसमधील किंवा बाहेरुन आलेल्यांसाठी व्हिडीओ कॉन्फरिन्सिंगद्वारे संवाद
– कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची सुविधा उपलब्ध करुन देणं, तसंच कार्यालयाच्या सोयीनुसार त्यांच्या कामाच्या तासात बदल करणे
– थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे

खासगी कार्यालयांसाठी
– खासगी कार्यालयात ५० टक्के उपस्थितीची मर्यादा
– कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या कर्मचाऱ्यांनाच प्रवेश, लस घेतले नसलेल्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करुन घ्यावे
– कर्मचाऱ्यांकडून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे याची काळजी घ्यावी
– थर्मल स्कॅनर, सॅनिटायझर उपलब्ध करुन द्यावे

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)