मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण निश्चित - अधिसूचना प्रसिद्ध

0


मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानंतर मुंबई महापालिकेकडून प्रभाग आरक्षण सोडत ३१ मे रोजी काढण्यात आली . यावर १ ते ६ जूनपर्यंत हरकती - सूचना मागवण्यात आल्या. या कालावधीत २३२ सूचना - हरकती प्राप्त झाल्या. त्यांना पालिका आयुक्तांनी मान्यता देऊन त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला. आ़योगाने अंतिम प्रभागनिहाय आरक्षण निश्चित करून सोमवारी राजपत्रात प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाकडून आता निवडणुकीबाबतची पुढील प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.

अनुसूचित जातींसाठी १५ प्रभाग आरक्षित ठेवले जाणार आहेत. त्या पैकी ८ प्रभाग महिलांसाठी राखीव असणार आहे. तर अनुसूचित जमातीसाठी २ प्रभाग आरक्षित आहेत. त्यापैकी एक प्रभाग महिला आरक्षित आहे. तसेच २१९ प्रभाग खुल्या वर्गासाठी ठेवण्यात येणार आहेत त्या पैकी १०९ प्रभाग महिलांसाठी आरक्षित असणार आहेत. दरम्यान मुंबई महापालिकेने निवडणूक कधीही लागली तरी आपली तयारी ठेवली आहे. सध्या ९० टक्के मतदार याद्यांचे काम पूर्ण झाले आहे. इतर कामांसाठीही महापालिका सज्ज झाली असून आयोगाच्या निर्देशानुसार पुढील निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे संबंधित अधिका-याने सांगितले.
Tags

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)