
मुंबई - पुण्यात बी.ए. ४ व ५ या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळल्यानंतर आता मुंबईतही पाच रुग्ण सापडले आहेत. यात २०१ ओमायक्रोन या उप प्रकाराने बाधित रुग्णांपैकी बी.ए. ४ चे तीन आणि बी ए.५ व्हेरीयटंचा एक रुग्णाचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण १४ मे ते २४ मे २०२२ या कालावधीतील असनू त्यातील दोन ११ वर्षाच्या मुली तर दोन ४० ते ६० वर्षे वयोगटातील पुरुष आहेत. हे सर्व रुग्ण घरगुती विलगीकरणात बरे झाले असून मागील १५ दिवसांमध्ये त्यांनी बाहेच्या देशात किंवा राज्यात प्रवास केलेला नाही. कोविड जनुकीय सूत्र निर्धारणांतर्गत १२ व्या फेरीतील चाचणीचे निष्कर्षातून ही माहिती समोर आली आहे.
‘कोविड - १९’ विषाणूच्या जनुकीय सूत्रांचे निर्धारण हे ऑगस्ट २०२१ पासून महापालिका आयुक्त इकबालसिंग चहल यांच्या निर्देशानुसार नियमितपणे व फेरीनिहाय करण्यात येत आहे. या कार्यवाही अंतर्गत बाराव्या फेरीदरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांचे निष्कर्ष समोर आले आहेत. या १२ व्या फेरीतील चाचण्यांसाठी २७९ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यापैकी २०२ नमुने बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील होते, तर उर्वरित नमुने हे बृहन्मुंबई मनपा क्षेत्राबाहेरील होते. मुंबई महापालिका क्षेत्रातील २०२ नमुन्यांपैकी ९९.५% अर्थात २०१ नमुने हे ‘ओमायक्रॉन’ या उप प्रकाराने बाधित असल्याचे निदर्शनास आले आहे, तर एक नमुना हा डेल्टा या उपप्रकाराने बाधित आहे. अशी माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली आहे. या चाचणीच्या निष्कर्षातून बी.ए. ४ व ५ या नव्या व्हेरियंटचे रुग्ण आढळले. बी.ए. ४ च्या तीन रुग्णांपैकी ११ वर्षाच्या मुली लसीकरणाच्या वयोगटात मोडत नाही व उर्वरित एक रुग्ण ऍलर्जीने बाधित असल्यामुळे त्याने देखील लसीची एकही मात्र घेतलेली नाही. बी ए.५ व्हेरीयटं चा एका रुग्णाने लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या असल्याचे आरोग्य विभागातून सांगण्यात आले.

ليست هناك تعليقات:
إرسال تعليق