देशभरातील मुस्लीम समाज रस्त्यावर

0


नवी दिल्ली - भाजपच्या दोन प्रवक्ते-नेत्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरात आज मुल्सिम समाज आणि विवध पक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. शुक्रवारच्या नमाजनंतर देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने होत आहेत.

दिल्लीतील जामा मशिदीबाहेर जोरदार निदर्शने सुरू आहेत. तर उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्येही शुक्रवारच्या नमाजानंतर मोठ्या संख्येने मुस्लीम समाजातील लोकं आंदोलनाच्या ठिकाणी जमा झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच प्रयागराजमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यात आल्याच समोर आले आहे. उत्तर प्रदेशातील शहरांमध्ये झालेल्या गदारोळानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गैरप्रकार करणा-यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रयागराजमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त पाठविण्यात आला आहे. डीजीपी डीएस चौहान, कायदा आणि सुव्यवस्थाचे प्रमुख प्रशांत कुमार आणि अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) अवनीश अवस्थी हे लखनौ पोलिस मुख्यालयाच्या नियंत्रण कक्षात उपस्थित आहेत. प्रयागराजमध्ये अधूनमधून दगडफेकीच्या घटना घडत आहेत. जाळपोळही झाली आहे. दगडफेकीत अनेक पोलिस जखमी झाले. त्यामुळे यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

महाराष्ट्रात ठीक-ठिकाणी आंदोलन -
दिल्ली आणि उत्तर प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणी आंदोलन सुरु आहे. औरंगाबाद, सोलापूर, जालना आणि कोल्हापुरात मुस्लीम समाज रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहे. औरंगाबादमध्ये जलील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. तर सोलापुरात सुद्धा हजारोच्या संख्येने आंदोलक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळत आहे. सर्वच ठिकाणाचा जमाव पाहता पोलिसांचा बंदोबस्त कमी पडत असल्याचे चित्र आहे. तर आंदोलनाला एवढी गर्दी होईल याचा पोलिसांना अंदाज आला नसल्याचे बोलले जात आहे.

Post a Comment

0Comments
Post a Comment (0)