पालिकेचे आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, इंजिनिअर व ठेकेदार यांना अटक करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 September 2016

पालिकेचे आयुक्त, महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, इंजिनिअर व ठेकेदार यांना अटक करा

राजकीय दबावामुळे पोलिसांची एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ
मुंबई / प्रतिनिधी - गेल्या २० वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेत शिवसेना व भाजपाची सत्ता आहे तरीही मुंबईच्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्त्यांवर खड्डेच खड्डे झालेले आहेत. त्यामुळे मुंबईकरांच्या पाठीचे तसेच कंबरेचे दुखणे वाढले आहे. मुंबईत दररोज अपघात घडत आहेत. जे जे उड्डाणपुलांनजीकच्या पोलीस चौकीजवळ खड्ड्यात बाईक आदळून रिझवान खान (२१) या तरुणाचा २६ सप्टेंबरच्या रात्री मृत्यू झाला. रिझवान आपल्या मित्रासह रात्री ११ च्या सुमारास जात असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्याची बाईक घसरून अपघात झाला. उपचारापूर्वीच अतिरक्तस्रावाने त्याच्या मृत्यू झाला. रिझवानच्या मृत्यूला मुंबई महानगरपालिकेत सत्ता असलेली शिवसेना व भाजपा सरकारच जबाबदार आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त, मुंबईच्या महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष तसेच रस्ते इंजिनिअर व ठेकेदार यांच्यावर एफआयआर दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करा अशी काँग्रेसचे मागणी आहे, असे उद्गार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काढले. मुंबई काँग्रेसतर्फे आज गुरुवार २९ सप्टेंनंबर रोजी दुपारी ३ वाजता जे जे मार्ग पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी संजय निरुपम बोलत होते.


संजय निरुपम म्हणाले कि एवढी मोठी घटना घडली तरी हि पोलिसांनी फक्त दैनंदिन नोंदवहीत तक्रार लिहून ४८ तासात चौकशी करण्याचे फक्त आश्वासन दिले. राजकीय दबावामुळे पोलिसांची एफआयआर दाखल करण्यास टाळाटाळ केली आहे. आम्ही सर्व जण सुमारे तीन तास जे जे मार्ग पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली, परंतु काहीच उपयोग झाला नाही. पोलिसांनी एफआयआर दाखल केलीच नाही. पुढच्या ४८ तासात जर कारवाई झाली नाही तर पुन्हा आम्ही सगळे या पोलीस स्टेशनवर धडक मोर्चा काढू व त्यानंतर उच्च न्यायालयात जाणार आहोत.

ते पुढे म्हणाले कि आम्ही महापालिकेला रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत अनेक निवेदने दिली, तक्रारी केल्या, खड्ड्यांचे छायाचित्रे पाठवली, परंतु महापालिकेने त्याकडे संपूर्णतः दुर्लक्ष केले, त्यामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मुंबईचे रस्ते तसेच रस्ते दुरुस्ती यामध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. हा एक मोठा रस्ते घोटाळा आहे. याला जबाबदार शिवसेना व भाजपा सरकारच आहे. महापालिका रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नेहमीच खोटे बोलत आली आहे. गणपतीपूर्वी सर्व खड्डे बुजवणार असे आश्वासन मुंबईकरांना दिले होते परंतु तसे काहीच झालेले नाही. मुंबईत सर्व रस्त्यांवर जागो जागी अजून हि खड्डेच खड्डे आहेत. गणपती जाऊन आता नवरात्री उत्सव आला आहे तरी हि रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. मुंबईकर हताश, निराश आणि त्रस्त झालेले आहेत. शिवसेना व भाजपा सरकार मुंबईकरांना मूलभूत गरजा देऊ शकत नाही आहे. हे सरकार महानगरपालिका चालविण्यात पूर्णतः अपयशी ठरलेली आहे. त्यामुळे आम्ही याआधीच हि मुंबई महानगरपालिका बरखास्त करा अशी मागणी केली होती, असे संजय निरुपम म्हणाले.

सदर प्रसंगी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासोबत त्यांचे वकील प्रद्युमन वाघमारे, आमदार अमिन पटेल, मनपा विरोधी पक्षनेते प्रविण छेडा, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील, महिला काँग्रेस अध्यक्षा शितल म्हात्रे, नगरसेवक मनोज जामसुतकर, नैना शहा, अनिता यादव, शहाना खान, वकार आपा युनुसा, उपाध्यक्ष जयप्रकाश सिंह, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष निजामुद्दीन राईन, मुंबई काँग्रेसचे सचिव राजेंद्र पवार, प्रणिल नायर, बंधु राय, आसिफ शेख, जितेंद्र खैरे, नितीन पाटील, विकास तांबे, जिल्हाध्यक्ष सुनील नरसाळे, अशोक सूत्राळे, काँग्रेसचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते

Post Bottom Ad