नाशिकचा ओबीसी मोर्चा भुजबळांच्या जामीनासाठी नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 October 2016

नाशिकचा ओबीसी मोर्चा भुजबळांच्या जामीनासाठी नाही

मुंबई । प्रतिनिधी - तीन आॅक्टोबर रोजी नाशिकमध्ये काढण्यात येणारा ओबीसी वर्गवारीतील जातींचा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना न्यायालयीन कोठडीतून जामीन िमळावा यासाठी नाही तर ओबीसी या वर्गवारीत मराठा जातीचा आरक्षणासाठी समावेश करु नये अशी मोर्चाची मुख्य मागणी असल्याचे भारिप बहुजन पक्षाचे अकोल्यातील आमदार बळीराम सिरस्कर आिण माजी आमदार हरिदास भदे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
देशात ओबीसी जातींची संख्या ५२ टक्के असूनही या वर्गवारीस केवळ २७ टक्के आरक्षण देण्यात आले आहे, ओबीसी आरक्षणात वाढ करण्यासाठी जातजनगणा करावी, ओबीसींनी मंिदरात पुजारी बनण्याचा हक्क िमळावा, ओबीसीमधील काही जातींना दलित अत्याचार प्रतिबंधक कायदा (अ‍ॅट्रॉसीटी) अंतर्गत संरक्षण द्यावे आिण ओबीसी जातींच्या नेत्यांना तुरुंगात डांबून तसेच मंत्रीमंडळातून काढून बदनाम करणे थांबवावे या मोर्चाच्या मागण्या असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षणास आमचा विरोध नाही, मात्र मराठा जातीस ५२ टक्केबाहेर स्वतंत्रपणे आरक्षण द्यावे असेही आमदार सिरस्कर म्हणाले. ओबीसी मोर्चा मराठा मोर्चाविरीद्धचा प्रतीमोर्चा नसल्याचे भदे यांनी स्पष्ट केले. नाशिकचा मोर्चा मूक मोर्चा असेल. या मोर्चास कोणत्याही राजकीय नेत्यांना िनमंत्रीत केलेले नाही. मोर्चाचे नेतृत्वही सामूहीक असेल तसेच मोर्चाला कोणत्याही राजकीय पक्षाचे पाठबळ नसल्याची माहिती माळी महासंघाचे शंकर लिंगे यांनी िदली.

Post Bottom Ad