५ महिन्यांत ३२४५ दुर्घटनांमध्ये ६३ जणांनी जीव गमावला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 December 2017

५ महिन्यांत ३२४५ दुर्घटनांमध्ये ६३ जणांनी जीव गमावला


विविध दुर्घटनांमध्ये १४९ जखमी -
मुंबई | प्रतिनिधी - मुंबईत अवघ्या पाच महिन्यांत विविध ठिकाणी तब्बल ३२४५ आगी लागण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. यामध्ये ६३ जणांना जीव गमवावा लागला असून १४९ जण जखमी झाले आहेत. पालिकेच्या कार्यक्षेत्रात झालेल्या दुर्घटनांमध्ये आग लागून झालेले मृत्यू, बिल्डिंग कोसळणे, झाड अंगावर पडणे, समुद्र-तलावात बुडून झालेले मृत्यू, अ‍ॅक्सिडंट, सिलिंडर स्फोटांत मृत्यू अशा अनेक दुर्घटनांचा समावेश आहे. या दुर्घटनांमध्ये आगीच्या दुर्घटनांची संख्या जास्त आहे. पाच महिन्यांची आकडेवारी पाहता प्रत्येक महिन्यात मुंबईत विविध प्रकारच्या ६४९ दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे. यामुळे गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्ट्या आणि कंपन्यांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा आहे की नाही याची पाहणी करण्याकरिता अग्निशमन दलात लवकरच ४० जीप आणल्या जाणार आहेत.

साकीनाका दुर्घटनेत १२ कामगारांना जीव गमवावा लागल्यानंतर पालिकेने सोसायट्या, व्यवसाय-आस्थापनांना आगप्रतिबंध योजना उभारण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. यानंतर ज्याठिकाणी आगप्रतिबंधक यंत्रणा आढळणार नाही त्यांची वीज-पाणी कापणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या संपूर्ण कार्यक्षेत्रात लवकरच इन्स्पेक्शन केले जाणार आहे. अग्निशमन अधिकारी आणि पालिका अधिकारी या इन्स्पेक्शनमध्ये सहभागी असतील. हे काम वेगाने होण्यासाठी आणि आगी लागण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी जीपची संख्या वाढवण्यात येणार आहे. अग्निमशन दलात सध्या ३९ जीप आहेत. यामध्ये प्रतिजीप ६.११ लाख किमतीच्या आणखी ४० जीप दाखल होतील. या जीपमध्ये वायरलेस डिव्हाईसदेखील असेल, ज्यामुळे आगीच्या घटनेची माहितीही तातडीने मिळण्यास मदत होणार असून मदतकार्य लवकर सुरू करण्यासाठी मदत होईल. यामध्ये टाटा कंपनीच्या जीप घेण्यात येणार असून यातील २८ जीपची ऑर्डरही देण्यात आली आहे.

दुर्घटनांची आकडेवारी - महिना      दुर्घटना   मृत     जखमी
एप्रिल         ४८१      ३        २७
मे               ४८६     २        ७५
जून            ६६७     ४        १७
जुलै           ९८४     ३९       ३४
ऑगस्ट      ६२७    १५        १४
एकूण      ३२४५    ६३       १४९

Post Bottom Ad