पालिकेच्या कामाचे महत्व मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यास दिनदर्शिका मोलाची मदतगार - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 December 2017

पालिकेच्या कामाचे महत्व मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यास दिनदर्शिका मोलाची मदतगार - महापौर


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई शहराचे जागतिक महत्‍त्‍व नि देशाची आर्थिक राजधानी म्‍हणून तिचे सौंदर्य वृध्‍दिंगत करण्‍यासाठी महापालिका दिवस रात्र झटत असल्यामुळेच मुंबई महानगराला आंतरराष्ट्रीय महानगराचा दर्जा प्राप्त झाला असून ही दिनदर्शिका बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामाचे महत्व मुंबईकरांपर्यंत पोहोचविण्यास मोलाची मदतगार ठरणार आहे, असे कौतुकोद्गार मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी काढले. सन २०१८ ची नागरी दैनंदिनी ही दरवर्षाप्रमाणे सर्वसमावेशक व माहितीने परिपूर्ण असल्याने ती बहुपयोगी ठरेल, असा विश्वासही महापौरांनी यावेळी व्यक्त केला.

मुंबई शहराच्‍या सर्वांगिण विकासासाठी बृहन्‍मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत असते. मुंबई महानगरपालिकेने 'मुंबई महानगरी सर्वांगिण विकासाकडे’ या संकल्पनेवर सन २०१८ च्‍या दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क खात्यातर्फे निर्मित मराठी दिनदर्शिकेचे (कॅलेंडर) व मराठी नागरी दैनंदिनी २०१८ (सिव्हीक डायरी) चे प्रकाशन मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांच्या हस्ते व स्‍थायी समिती अध्‍यक्ष रमेश कोरगावंकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महापौर निवासस्थान येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी सुधार समितीचे अध्‍यक्ष अनंत नर, आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा रोहिणी कांबळे, नगरसेवक हाजी अलीम खान, महापालिका उप आयुक्त (आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन) डॉ. किशोर क्षीरसागर, जनसंपर्क अधिकारी विजय खबाले –पाटील, महापालिका मुद्रणालयाचे व्यवस्थापक सुधीर तळेकर हे उपस्थित होते.

सन २०१८ ची दिनदर्शिका ही भायखळ्याचे (राणीचा बाग) वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान – प्राणिसंग्रहालय हे मुंबईकरांचे तसेच पर्यटकांचे आणि परदेशी पाहुण्‍यांचे प्रमुख आकर्षण केंद्र, या प्राणिसंग्रहालयाचे महत्‍त्‍व जाणून बृहन्‍मुंबई महानगरपालिकेने या उद्यानामध्‍ये अत्‍यंत देखणा अशा हम्‍बोल्‍ट पेंग्विन कक्ष उभारुन मुंबईकरांच्‍या आनंदात मोलाची भर घातली आहे. वृक्षारोपण, सौंदर्यवर्धन करुन युवा पिढीला आकर्षित करण्‍यासाठी सुंदर, सुशोभित सेल्‍फी पॉईंट्सही विकसित केले आहे. प्रस्‍तावित मुंबई सागरी किनारी रस्‍ता, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेतर्फे सायकलसाठी ३६ किलोमिटर प्रदुषणमुक्‍त स्‍वतंत्र मार्गिका अशा विविध ढंगाने व विशेष तंत्राचा वापर करुन काढलेल्या छायाचित्रांचा वापर अशी ही बृहन्मुंबई महानगरपालिका दिनदर्शिका – २०१८ आकर्षक ठरली आहे.

महापालिकेचे जनसंपर्क खाते सन १९५८ पासून नागरी दैनंदिनी (सिव्हीक डायरी) प्रकाशित करीत असून यंदा नागरी दैनंदिनीचे ६० वे वर्ष आहे. नागरी दैनंदिनी ५९ वर्षांपासून सातत्याने प्रकाशित करीत असताना ती एक संग्राह्य नि महत्वपूर्ण माहितीसह परिपूर्ण असेल, यावर भर दिला जातो. तसेच सन १९९३ पासून दिनदर्शिका प्रकाशित करण्यात येते. दिनदर्शिकेकरीता विशिष्ट संकल्पना निवडून त्याची छायाचित्रे, माहिती मांडण्यावर अलीकडे भर दिला जात आहे. सन - २०१२ मध्ये सुशोभित मुंबई - एक अलंकारिक काव्य, महानगरी मुंबईचे आद्य शिल्पकार (२०१३), वास्तु वैभव-समृद्ध मुंबई (२०१५) या दिनदर्शिकेच्या संकल्पना मुंबईकरांमध्ये विशेष लोकप्रिय झाल्या असून एक पाऊल.. स्वच्छ मुंबईकडे (२०१६) नंतर ‘लखलखीत.. वेगवान मुंबई’ (२०१७) या विषयांसोबतच येणारी दिनदर्शिकाही जनतेच्या पसंतीस उतरेल, याचा आत्मविश्वास प्रशासनाला आहे.

Post Bottom Ad