'बेस्ट’ कर्मचार्‍यांच्या पगारातून बोनस रक्कम कापणार नाही - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

09 January 2018

'बेस्ट’ कर्मचार्‍यांच्या पगारातून बोनस रक्कम कापणार नाही


मुंबई । प्रतिनिधी - ‘बेस्ट’ कर्मचार्‍यांना दिलेला दिवाळी बोनस त्यांच्या पगारातून कापण्याच्या हालचाली ‘बेस्ट’ प्रशासनाने सुरू केल्या होत्या. मात्र शिवसेनेने केलेल्या पाठपुराव्यानंतर आयुक्त अजोय मेहता यांनी ‘बेस्ट’ प्रशासनाला कामगारांना दिलेला बोनस पगारातून कापून घेऊ नये, असे निर्देश दिले आहेत.

‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती डबघाईला आल्याचे सांगत प्रशासन आणि आयुक्तांनी कर्मचार्‍यांना दिवाळी बोनस देणे शक्य नसल्याचे सांगितले. संघटनांनी यामुळे संपाचा इशाराही दिला होता. या पार्श्वभूमीवर महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी बोनससाठी पालिकेकडून २५ कोटी रुपये द्यावे, अशी सूचना केली होती. आयुक्तांनी ही सूचना मान्य करताना ‘बेस्ट’मध्ये सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव तयार केला। शिवाय याची अंमलबजावणी करण्याची अट घातली होती. बेस्टने यातील अनेक सुधारणा स्विकारल्याचे सांगितले. यावेळी कर्मचार्‍यांना मिळालेला साडेपाच हजार रुपयांचा बोनस समान अकरा हफ्त्यांमध्ये कापून घेण्याबाबत परिपत्रकच काढले. यामुळे कर्मचार्‍यांमध्ये प्रचंड संताप लाट पसरली. जानेवारी महिन्यापासून ही रक्कम कापली जाणार होती. या पार्श्वभूमीवर ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी सोमवारी आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेऊन बोनसची रक्कम पगारातून कापू नये अशी मागणी केली. या मागणीला आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देत पगारातून बोनस कापणार नसल्याची ग्वाही दिल्याचे असे कोकीळ यांनी सांगितले. यामुळे सुमारे ४५ हजार ‘बेस्ट’ कामगारांना दिलासा मिळाला आहे.

Post Top Ad

test
test