Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

माटुंगा स्टेशनची "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड"मध्ये नोंद

मुंबई । प्रतिनिधी - महिलांचे सबलीकरण केले पाहिजे अश्या सर्वत्र नुसत्या बाता मारल्या जातात प्रत्यक्ष कृती मात्र केली जात नाही. अशा परिस्थितीत मध्य रेल्वेने जुलै २०१७ मध्ये माटुंगा रेल्वे स्थानकातील सर्व कामाकरिता महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. गेले सहा महीने या स्थानकाची जबाबदारी महिला कर्मचाऱ्यांकडून पार पडली जात आहे. देशभरात मध्य रेल्वेवरील फक्त महिलांमार्फत चालवलं जाणार माटुंगा हे पहिलं रेल्वे स्थानक ठरलं आहे. याची दखल घेत माटुंगा स्थानकाची नोंद "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड २൦१८" मध्ये नोंद झाली आहे. 

मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात ४ प्लॅटफॉर्म आहेत. या स्थानकातून दररोज ३० ते ३५ हजार प्रवासी प्रवास करतात. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्या पुढाकारातून सहा महिन्यापूर्वी माटुंगा रेल्वे स्थानकाची जबाबदारी महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली होती. रेल्वे स्थानकाचं व्यवस्थापन, तिकीट आरक्षणापासून ते रेल्वे मालमत्तेच्या सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) अशा सर्वच कामांसाठी ४१ महिला कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत. यात महिला स्टेशन मास्टरसह १७ बुकिंग क्लार्क, ८ तिकीट तपासनीस, ५ पॉईंट अधिकारी, २ अनाऊन्सर आणि २ सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी ६ महिला अधिकारी-कर्मचारी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने तैनात करण्यात आले आहेत. या पद्धतीने पूर्णत: महिला अधिकारी-कर्मचारी असलेले माटुंगा पहिले स्थानक ठरले आहे. या महिला कर्मचारी गेल्या सहा महिन्यांपासून रेल्वे स्टेशनचे संपूर्ण कामकाज हाताळत आहेत. ३० जून रोजी स्थानकात सहाय्यक स्टेशन मास्तर म्हणून ममता कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली. ममता कुलकर्णी या मध्य रेल्वेच्या मुंबई मंडळातील पहिल्या सहाय्यक स्टेशन मास्तर ठरल्या आहेत. मध्य रेल्वेने महिलां कर्मचारी अधिकाऱ्यांवर टाकलेला विश्वास आणि जबाबदारी योग्य रित्या पार पाडत आहेत. याची दखल घेत माटुंगा स्थानकाची "लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड २൦१८" मध्ये नोंद झाली आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom