भीमा कोरेगाव प्रकरणी १० दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन - भीम आर्मी - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

10 January 2018

भीमा कोरेगाव प्रकरणी १० दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलन - भीम आर्मी


भिमाकोरेगाव ग्रामपंचायतीवर अट्रॉसिटी लावा -
मुंबई - भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी उसळलेल्या दंगलीप्रकरणी तक्रार दाखल झालेल्या मनोहर उर्फ संभाजी भिडे , मिलिंद एकबोटे तसेच इतर समाजकंटकांना येत्या दहा दिवसात अटक करून पुढील कारवाई न केल्यास महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा ईशारा भीम आर्मी संघटनेने दिला आहे . १ जानेवारी रोजी बनावटी ठराव करून भिमाकोरेगाव बंद ठेवणाऱ्या ग्रामपंचायतीवर अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा अशी मागणीही या संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

भीमा कोरेगाव रणसंग्रामाच्या 200 वर्ष पूर्तीनिमित्त भीमा कोरेगाव येथील विजयी स्तंभास तसेच वढू येथील छत्रपती संभाजी महाराज स्मारक व गोविंद गोपाळ (गणपत) गायकवाड यांच्या समाधी स्थळाला मानवंदना देण्यासाठी आलेल्या जनतेवर, वाहनांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले, दगडफेक करून जखमी करण्यात आले. असले भ्याड कृत्य करून महाराष्ट्र आणि देशातील कायदा व सुव्यवस्था बिघडविण्यास कारणीभूत असलेले पुण्यातील मिलिंद एकबोटे यांच्यासह त्यांचे सहकारी यांचे मागील आठवडाभरातील सर्व काॅल डिटेल्सची चौकशी करण्यात यावी.पुणे- नगर- शिरुर रोड तसेच वढू बुद्रुक रोडवर वाहनांवर दगडफेक व हल्ले करून महिला, लहान मुले यांना जखमी करणा-या हल्लेखोर समाजकंटकांवर अॅट्राॅसिटीसह मारहाण,नुकसान व सामाजिक सलोखाबिधडविणाऱ्यासमाजकंटक अजून बाहेर फिरत असून त्यांना त्वरित अटक करावी झालेल्या सर्व मालमत्ता नुकसानीची वरील सबंधितांपासून नुकसानभरपाई वसूल करावी.धर्मवीर संभाजी राजे स्मृती समिती वढू बुद्रुक च्या अध्यक्ष पदावरून मिलिंद एकबोटे याची हकालपट्टी करण्यात यावी.कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पोलिसांमार्फत शाळकरी मुले व महाविद्यालयीन विद्यार्त्यांचे चाललेले अटकसत्र थांबवून अटकेत असलेल्या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी , वढू बुद्रुक येथील गोविंद गोपाळ (महार) उर्फ गणपत गायकवाड बाबा समाधीचे शेड व माहीतीफलक पुर्ववत लावण्यात यावा. वढू बुद्रुक गावातील गोविंद गोपाळ गणपत गायकवाड यांच्या वंशजांना कडक सुरक्षा व्यवस्था पुरविण्यात यावी. पुणे जिल्ह्यातील पोलिसांच्या निष्क्रीय भूमिकेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.तसेच १ जानेवारी रोजी जाणीवपूर्वक गाव बंद ठेवून आंबेडकरी जनतेला वेठीस धरल्याप्रकरणी भीमा कोरेगाव ग्रामपंचायतीचा सर्व विकास निधी रोखून त्यांच्यावर अट्रॉसिटी कायदा लावण्यात यावा अशी मागणी भीम आर्मी भारत एकटा मिशन या संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोकभाऊ कांबळे यांनी मुख्यमंत्रायनकडे केली आहे येत्या दहा दिवसात या मागण्यांवर कारवाई न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन ​करून सरकारला याचा जाब विचारण्यात येईल अशा इशाराही कांबळे यांनी दिला आहे .

Post Top Ad

test
test