बेस्टच्या आणिक व प्रतीक्षानगर डेपोना लागणार टाळे? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्टच्या आणिक व प्रतीक्षानगर डेपोना लागणार टाळे?

Share This
मुंबई | प्रतिनिधी - आर्थिक संकटात असलेल्या बेस्ट उपक्रमाला आर्थिक गर्तेतून बाहेर काढण्यासाठी एकीकडे बसचा ताफा कमी केला जात असताना बेस्ट डेपोना टाळे ठोकण्याची तयारी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. बेस्टचे आणिक व प्रतिक्षानगर हे दोन डेपो समितीला अंधारात ठेवून प्रशासनाने बंद केल्यास त्याचे परिणाम बेस्टला भोगावे लागतील, असा इशारा देत सदस्यांनी बेस्ट प्रशासनाला धारेवर धरले. 

बेस्ट उपक्रम आर्थिक संकटात सापडला आहे. या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी बेस्ट उपक्रमाची आता आणिक व प्रतीक्षानगर डेपोच्या भूखंडावर वक्रदृष्टी पडली आहे. या डेपोची जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी त्या विकण्याचा प्रशासनाचा डाव आहे, असा आरोप भाजपचे सुनील गणाचार्य यांनी हरकतीचा मुद्द्याद्वारे उपस्थित केला. बेस्ट प्रशासन कोणतेही कारण देऊन बस डेपो बंद करण्याचा प्रयत्न करीत आहेत. बेस्ट समिती सदस्यांना अंधारात ठेऊन बेस्ट प्रशासनाने ही बस डेपो बंद करण्याचा प्रयत्न केल्यास बेस्ट समिती हा डाव तो हाणून पाडतील, असे सांगत बेस्ट समिती सदस्यांनी बेस्ट प्रशासनास धारेवर धरले. यावर बोलताना सध्या माझ्याकडे तरी अशी कोणतीही फाईल आलेली नाही. आपल्याला याबाबत कोणतीही कल्पना नाही. मात्र असे काही करायचे झाल्यास समिती सदस्यांच्या भावनांचा विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे यावर स्पष्टीकरण बेस्ट महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी दिले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages