Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

मृतदेह आणून पालिका मुख्यालयासमोर आंदोलन


महिला सफाई कर्मचारीची आत्महत्या -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेमधील कंत्राटी सफाई कामगारांना सामान काम सामान वेतन तसेच कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. यानंतरही कंत्राटी सफाई कामगारांना नोकरीवर घेण्यास पालिका टाळाटाळ करत आहे. यामुळे या कामगारांना कर्ज काढून दिवस काढावे लागतात. अश्याच अंधेरी येथील के - पश्चिम विभागातील कंत्राटी सफाई कामगार सुमती देवेंद्र यांनी पालिकेने काम नाकारल्याने व कर्ज वाढल्याने बुधवारी फाशी घेऊन आत्महत्या केली. या महिलेचा मृतदेह घेऊन गुरुवारी कचरा वाहतूक संघाने पालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन केले. यामुळे मुख्यालयातील वातावरण काही वेळासाठी तणावपूर्व झाले होते. दरम्यान पुढील महिन्यापासून भीक मांगो आंदोलन केले जाणार असल्याचेही संघटनेने जाहिर केले.

कचरा वाहतूक संघाच्या न्यायालय यादीतील संरक्षण असलेल्या कामगार सुमती देवेंद्र (28) ही महिला के (पश्चिम) विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करीत होती. न्यायालयाचे संरक्षण असतानाही मागील काही महिन्यांपासून पालिकेने काम नाकारण्यात आले होते. निय़मानुसार अशा कामगारांना 22 हजार वेतन मिळायला हवे. तेही नाही मिळाले तर किमान वेतन नियमानुसार 15 हजार रुपये मिळणे आवश्यक होते. मात्र तसे न होता, सहा ते आठ हजार रुपयेच वेतन दिले जात होते. तुटपुंज्या वेतनात कुटुंब चालवणा-या या महिलेचे किमान वेतन थकबाकीचे एक लाख रुपयेही पालिकेने दिलेले नाही. तर काम केल्य़ाचे वेतनही मागील सहा महिन्यांपासून मिळा्लेले नव्हते. महिलेला 11 वर्षाची मुलगी आहे. मात्र संरक्षण असतानाही नोकरी नाकारली जात असल्याने व तुटपुंज्या वेतनात काम करावे लागत असल्याने या महिलेला जगणे कठीण झाले, आणि कंटाळून तिने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून पालिका अधिका-यांनी केलेली हत्या आहे, असा आरोप संघटनेने आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. पालिकेने 130 कामगारांना कामावरून काढून टाकले आहे. न्यायालयाचे संरक्षण असणा-या अशा कामगारांना काम द्यावे आणि असे प्रसंग टाऴावे. तसेच संबंधित अधिका-यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही संघाने केली आहे. दरम्यान मृत सुमन देवेंद्र यांच्या वारसाला पालिकेत नोकरी आणि नुकसान भरपाई मिळावी अशी मागणीही आयुक्तांकडे केल्याचे संघटनेचे मिलिंद रानडे यांनी सांगितले. कामगारांची किमान वेतनाची तब्बल 65 कोटी रुपये पालिकेकडे थकीत आहे. मेडिक्लेमची व किमान वेतनाची रक्कम पगारातून कापून घेतली जाते, मात्र दिली जात नाही. आत्महत्या केलेल्या सुमती देवेंद्र या महिलेचे 1 लाख रुपये पालिकेकडे थकीत आहे. कधी मिळणार याचीही शास्वती नसल्याचे रानडे यांनी सांगितले.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom