मुंबईतील विविध दुर्घटनांत ६ जण जखमी - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

30 January 2018

मुंबईतील विविध दुर्घटनांत ६ जण जखमी


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईतील डोंगरी, अंधेरी तसेच विद्याविहार येथे घडलेल्या विविध दुर्घटनांत ६ जण जखमी झाले आहेत. यात एका महिलेचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. 

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून आगीच्या घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. कमला मिल दुर्घटनेतनंतर मुंबईत सातत्याने आगीच्या घटना घडत आहे. दर एक दोन दिवसआड मुंबईत आगी लागत आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले असून अग्निशमन दलातील जवानांवर कामाचा ताण वाढला आहे. शनिवारी गोरेगाव येथील कामा इंडस्ट्रीयलमध्ये लागलेली भीषण आगीची घटना ताजी असतानाच आज दुपारी डोंगरी येथील दुकानांना शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यामुळे तेथे एकच खळबळ उडाली. डोंगरी येथील जे. बी. शहा मार्गावर मोहमदी मंजिल ही इमारत आहे. या इमारतीच्या बाजूलाच काही दुकाने आहेत. दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांनी तेथील एका दुकानाला शॉर्टसर्किटमुळे आग लागली क्षणात या आगीने बाजुच्या अन्य दोन दुकानांना वेढले. त्यावेळी दुकानात अनेकजण होते. या घटनेनंतर तेथील लोकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी पोहोचले. ही आग त्वरित विझाली. मात्र या घटनेत ४ जण जखमी झाले. अस्लम हुसेन बाबी (४५), फईज अहमद अस्लम (१९), सोहेल हसन बाबी (३०) व हजारीमल गुप्ता (३०) अशी या घटनेतील जखमींची नावे आहेत. ते २५ ते ३० टक्के भाजले असून, त्यांच्यावर जे. जे.रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अंधेरी पश्चिम, वर्सोवा येथील एस.व्ही.रोडवरील जुन्या म्हाडा सोसायटीतील १ अधिक १ बांधकाम असलेल्या इमारतीचा स्लॅबचा भाग आज सकाळी १०.३० च्या सुमारास कोसळला.त्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली काहीजण अडकले.या घटनेनंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. त्यांनी तात्काळ मदतकार्य हाती घेऊन ढिगाऱ्याखालुन ४ जणांना बाहेर काढले. मात्र या घटनेत एक महिला गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी कूपर रुग्णालयात नेण्यात आले. मोनियारा व्ही. व्ही. शेख (३२) असे यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अन्य एका घटनेत विद्याविहार येथे आज सकाळी सुलभ शौचालयाचा भाग खचल्याने एक इसम जखमी झाला. त्याच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

Post Top Ad

test
test