मनसेच्या त्या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

25 January 2018

मनसेच्या त्या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशावर शिक्कामोर्तब


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगर पालिकेतील मनसेच्या सहा नागरसेवकांनी आपल्या पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत कोंकण आयुक्तांकडे गेले कित्तेक महिने सुनवाई प्रलंबित होती. गेले कित्तेक महिने सुनावणी प्रलंबित असल्याने या प्रकरणी उलट सुलट चर्चा सुरु होती. सुनावणी दरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यावर पुढील तारीख जाहीर करण्याचे सांगण्यात आले. यामुळे या प्रकरणाचा निकाल लवकर लागणार कि नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यादरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात आज रात्री उशिरा मनसेच्या फुटीर नगरसेवकांसह शिवसनेच्या ९३ नगरसेवकांच्या गटाला कोंकण आयुक्तांनी अधिकृत मान्यता दिल्याचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जाहीर केले. यामुळे मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशावर शिक्कामोर्तब झाले आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये संपन्न झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत मनसेचे सात नगरसेवक निवडून आले होते. भांडुप येथील काँग्रेसच्या नगरसेविका प्रतिभा पाटील यांच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागी पोटनिवडणुकीत पाटील यांची सून भाजपच्या तिकिटावर जिंकून आल्या. भाजपच्या उमेदवार जिंकल्याने भाजपच्या नेत्यांनी भाजपाचा महापौर बसवण्याचे वक्तव्य केले. यामुळे भाजपाकडून राजकीय उलथापालथ होण्याआधीच शिवसेनेने मनसेचे मनसेमधील पदाधिकारी वरिष्ठ अश्या नगरसेवकांना किंम्मत देत नव्हते. खुद्द राज ठाकरे या नगरसेवकांना भेट देत नव्हते. यामुळे आपली राजकीय कारकिर्दीचा प्रश्न निर्माण झाल्याने मनसेच्या सात पैकी दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, अर्चना भालेराव, परमेश्वर कदम, हर्षला मोरे, अश्विनी माटेकर या सहा नगरसेवकांनी मनसेला सोडचिट्ठी दिली होती. मनसेमधून बाहेर पडताना आपला गट बनवत सर्वच नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसनेंत प्रवेश केल्याने भाजपा आणि मनसेमध्ये खळबळ उडाली होती. यादरम्यान मनसेकडून या सहा नगरसेवकांविरोधात कोंकण आयुक्तांकडे तक्रार दाखल करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी करण्यात आली. याप्रकरणी गेले कित्तेक महिने अनेक कारणांनी सुनवाई पुढे ढकलण्यात येत होती. यादरम्यान उलटसुलट चर्चा सुरु होती. यामुळे कोंकण आयुक्तांकडे सुनावणी कधी होणार आणि मनसेच्या फुटीर नगरसेवकांच्या प्रकाणावर पडदा कधी पडणार असे प्रश्न उपस्थित केले जात होते. नुकतीच २३ जानेवारीला सुनावणी दरम्यान पुढील तारीख दिल्याचे सांगितले गेले होते. दरम्यान आज गुरुवारी पालिका सभागृहात मनसेच्या सहा नगरसेवकांसह शिवसनेच्या ८४ व अपक्षांच्या ३ असे एकूण ९३ नगरसेवकांच्या गटाला मान्यता दिल्याचे पत्र कोंकण आयुक्तांनी पालिकेला पाठविले. या पत्राचे वाचन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सभागृहात वाचन केले. यामुळे मनसेच्या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आहे.

पक्षीय बळाबळ -
शिवसेना ८४ 

अपक्ष ३
मनसेचे ६
एकूण ९३

भाजपा ८३
अपक्ष २
एकूण ८५

काँग्रेस ३०
राष्ट्रवादी ९
समाजवादी ६
एमआयएम २
मनसे १

Post Top Ad

test
test