महाराष्ट्राच्या २२ जवानांना सेना पदक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

महाराष्ट्राच्या २२ जवानांना सेना पदक

Share This

नवी दिल्ली - देशातील ३९० जवानांना सेना पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे,महाराष्ट्राच्या २२ जवानांचा यात समावेश आहे. संरक्षण मंत्रालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. यामध्ये परम विशिष्ट सेवा पदक, कीर्ती चक्र, उत्तम युद्धसेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक, शौर्य चक्र, व सेना पदक या पुरस्कारांचा समावेश आहे.

देशातील २८ अधिकाऱ्यांना परम विशिष्ट सेवा पदक -
यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये २८ जवानांना परम विशिष्ट सेवा पदक, ४९ जवानांना अति विशिष्ट सेवा पदक १० जवानांना युद्ध सेवा तर १२१ जवानांना विशिष्ट सेवा पदक,१४ शौर्य चक्र, १० युद्ध सेवा पदक, तर एका जवानास कीर्ती चक्र पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या दोन अधिकाऱ्यांना परम विशिष्ट सेवा पदक -
महाराष्ट्राच्या २२ जवानांमध्ये २ अधिकाऱ्यांना परम विशिष्ट सेवा पदक, ४ अधिकाऱ्यांना अति विशिष्ट सेवा पदक, ७ अधिकाऱ्यांना सेना पदक (शौर्य), ५ अधिकाऱ्यांना विशिष्ट सेवा पदक, २ वायू पदक तर १ अधिकाऱ्यास नौसेना पदक व एकास युद्ध सेवा पदक जाहीर झाले आहे.

महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांची नावे खालील प्रमाणे -
परम विशिष्ट सेवा पदक -
१. ले. जनरल राजेंद्र रामराव निंमभोरकर – लष्कर
२. व्हाइस एडमिरल ए.आर. कर्वे - नौदल.

अति विशिष्ट सेवा पदक -
१. मेजर जनरल माधुरी कानिटकर – लष्कर
२. सर्जन व्हाइस अडमिरल ए.ए. पवार- नौदल
३. एअर कमोडोर कार्तिकेय काळे- वायुदल
४. एअर व्हाइस्‍ मार्शल सुनिल जयंत नानोडकर – वायुदल

युध्द सेवा पदक -
१. बिग्रेडीअर अभिजीत सुरेद्र पेंढारकर – लष्कर

सेना पदक (शौर्य) -
१. ले. कर्नल प्रवीण माधव खानझोडे – लष्कर
२. मेजर तेजस बी. कांदाडे- लष्कर
३. कॅप्टन कौस्तुभ प्रकाशकुमार राणे – लष्कर
४. हवालदार राजराम तुकाराम करमभालकर – लष्कर
५. नाईक संदीप सर्जेराव जाधव – लष्कर
६. शिपाई संदीप कैलास खराडे- लष्कर
७. शिपाई सावन बाळकु माने – लष्कर

नौसेना पदक (कर्तव्य परायणता) -
१. अविनाश बावणे – नौदल

वायुसेना पदक (कर्तव्य परायणता) -
१. ग्रुप कॅप्टन जीतेंद्र दिनकर मासुरकर – वायुदल
२. ग्रुप कॅप्टन अभय अरुण फणसलकर – वायुदल

विशिष्ट सेवा पदक -
१. ब्रिगेडीअर विजय रामचंद्र देशमुख – लष्कर
२. ब्रिगेडीअर अनिमिष सुरेश रानडे – लष्कर
३. कमोडोर विठ्ठल राम पेशवे- नौदल
४. कमोडोर हिमांशु श्रीकृष्ण सप्रे – नौदल
५. ग्रुप कॅप्टन राजेश सुरेश नांदेडकर – वायुदल

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages