फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करताना युनियनही अंधारात - शशांक राव - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

21 January 2018

फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करताना युनियनही अंधारात - शशांक राव


मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत फेरीवाल्यांवरून राजकारण तापले असताना आता त्यात फेरीवाला युनियननेही उडी घेतली आहे. फेरीवाल्यांच्या जागा निश्चित करताना टाऊन वेंडिंग कमिटीची एकही बैठक झालेली नाही. फेरीवाल्यांच्या युनियनलाही महापालिकेने विचारात घेतलेले नाही. युनियनला अंधारात ठेऊन फेरीवाल्यांच्या जागा निश्चित केल्या असल्याने, जाहीर केलेल्या जागांना विरोध असल्याचे मुंबई हॉकर्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेने फेरीवाला धोरणासाठी मुंबईतील फेरीवाल्याना 85 हजार 891 जागा निश्चित केल्या आहेत. या जागांची प्रस्तावित यादी पालिकेने संकेत स्थळावर सूचना, हरकतीसाठी जाहीर केल्यानंतर या विरोधात राजकीय वाद पेटला आहे. जागा निश्चित करताना महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, नगरसेवक यांना विचारात घेतलेले नाही. प्रस्तावित यादी वाद निर्माण करणारी आहे, असे म्हणत ही यादीच रद्द करून पुन्हा नवी यादी तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. जागांबाबत राजकीय वाद सुरू असतानाच आता युनिनननेही या यादीला विरोध केला आहे. फेरीवाला धोरणासाठी नियुक्त केलेल्या टाऊन वेंडिंग कमिटीची आतापर्यंत एकही बैठक झालेली नसल्याची धक्कादायक माहिती राव यांनी दिली. या यादीबाबत फेरीवाल्यां सोबत काम करणाऱ्या हॉकर्स युनियनलाही विचारात घेण्यात आलेले नाही. फेरीवाल्यांचा विचार करून यादी तयार करण्यात आली नसल्याचे दिसते आहे. त्यामुळे या यादीला आमच्या युनियनचा विरोध आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्री, पालिका आयुक्त यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे राव यांनी सांगितले. दरम्यान, जागांबाबत राजकीय वाद पेटला असतानाच आता हॉकर्स युनियननेही यादीला विरोध केला असल्याने प्रस्तावित यादीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Post Top Ad

test
test