दोन वर्षात दोन लाख झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दोन वर्षात दोन लाख झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण

Share This

पात्र- अपात्रता निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईतील ६० टक्के जागा झोपडयांनी व्यापलेली आहे. मुंबईतील झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार गेल्या दोन वर्षात २ लाख झोपड्यांचा बायोमेट्रिक सर्व्हे पूर्ण झाला असून २ लाख ५० हजार १०७ झोपड्यांवर क्रमांक टाकण्यात आले आहे. सर्वेक्षण झालेल्या झोपड्यांची पात्र, अपात्रता करण्याची प्रक्रियाही सुरु झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान झोपड्या्ंचे सर्वेक्षण सुरू असताना काहीजण गावी किंवा त्याचवेळी घरी नसल्याने अनेकांच्या झोपड्यांवर नंबर टाकलेले नाही, किंवा सर्व्हेसाठीही कोण आले नसल्याच्या तक्रारी आहेत. यथावकाश संबंधित अधिकारी पुन्हा यासाठी येतील अशी सांगितले जात असल्याने झोपडीधारकांकडून प्रतीक्षा केली जात असल्याचे काही रहिवाशांनी सांगितले.

मुंबईत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात झोपड्या वसल्या आहेत. काही जागांवर अतिक्रमण करुन झोपड्या हडप करण्याचा प्रयत्न होतो. अनेक झोपड्या बहुमजली असल्याने या झोपड्यांचा मालक कोण याचा थांगपत्ता लागत नाही. झोपड्यांचा पुनर्विकास किंवा कोणतीही सरकारी योजना सुरू करताना किंवा अशा जागांवर महत्वाकांक्षी प्रकल्प राबवताना माहिती मिळवण्यासाठी संबंधित प्राधिकरणाला अडचणी येत असल्याने विलंब होतो. या अडचणींवर पर्याय म्हणून राज्य सरकारने अशा झोपड्यांचा बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याचा घेतला आहे. दोन वर्षापूर्वी सर्वेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे. खासगी, पालिका, राज्य सरकार, केंद्र सरकार आदी जागांवर वसलेल्या झोपड्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. सर्व प्राधिकरणाच्या जागांवरील झोपड्यांचे सर्वेक्षण केले जाते आहे. आतापर्यंत २ लाख ५० हजार १०७ झोपड्यांवर नंबर टाकून झाले आहेत. तर दोन लाख झोपड्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. एकीकडे सर्व्हेचे काम पूर्ण झाले असतानाच दुसरीकडे संगणकावर डाटा अपडेट करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. पूर्ण झालेल्या सर्व्हेच्या फाईल्स पात्र - अपात्रतेच्या कामासाठी सक्षम प्राधिकारी अधिका-यांकडे पाठवण्यात आल्या असून त्या कामाची प्रक्रियाही सुरू झाली आहे. यापूर्वी सुमारे आठ लाख झोपडयांचा सर्व्हे केला जाईल, असे नियोजन होते, मात्र झोपड्य़ांचे प्रमाण वाढते असल्याने तूर्तास तरी किती झोपड्यांचा सर्व्हे केला जाणार याची माहिती सांगता येणार नाही. मात्र मुंबईत जेवढ्या झोपड्या वसल्या आहेत त्या सर्व झोपड्यांचा सर्व्हे केला जाणार आहे. बायोमेट्रिक सर्व्हेची माहिती संगणकावर फिड करण्यात येत असल्याने एका क्लिकवर माहिती उपलब्ध होणार आहे, अशी माहिती एका अधिका-यांने दिली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages