दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट तर्फे विशेष सुविधा - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

18 February 2018

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना बेस्ट तर्फे विशेष सुविधा


मुंबई । प्रतिनिधी - येत्या २१ फेब्रुवारी पासून २० मार्चपर्यंत बारावीच्या तर १ मार्च पासून २४ मार्चपर्यंत दहावीच्या परिक्षा संपन्न होणार आहेत. या कालावधीत परिक्षेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत बसने जाण्याची सुविधा उपलबध करून दिली आहे. विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या पास व्यतिरिक्त वेगळे तिकीट काढण्याची गरज भासणार नाही. परीक्षा कालावधीमध्ये महापालिका विद्यार्थी ज्यांच्याकडे बसपास उपलब्ध नाहीत अशा विद्यार्थाना परीक्षा केंद्राच्या प्रवेशपत्रावरील शाळेचा शिक्का पाहून संबंधित विद्यार्थी महापालिका शाळेचा विद्यार्थी असल्याची खात्री करून पूर्ण प्रवासभाडे 'न' आकारात सवलतीचे प्रवासभाडे आकारण्यात येईल. परीक्षा कालावधीमध्ये परीक्षार्थी विद्यार्थाना बसगाडीमध्ये पुढील प्रवेशद्वाराने प्रवेशाची मुभा राहील.परीक्षार्थी विद्यार्थाना प्राधान्याने बससेवा उपलब्ध होईल, याकरिता गर्दीच्या बसथांब्यावर अधिकारी / पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच शालेय व्यवस्थापनाकडून सूचना आल्यास अतिरिक्त बसगाड्यांचे प्रवर्तन देखील करण्यात येणार आहे. परीक्षार्थी विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी बेस्ट उपक्रमातर्फे उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांची नोंद घेऊन, बेस्ट बसने प्रवास करावा असे आवाहन बेस्ट प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post Top Ad

test