पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची आणि मुलीची हत्या - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची आणि मुलीची हत्या

Share This

मुंबई । प्रतिनिधी - नागपूर येथील गुन्हे वाढत असल्याची टिका नेहमीच होत आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यातच गुन्हे वाढत असल्याने इतर राज्यातील परिस्थिती पाहायला नको असं बोललं जात आहे. या टिकेच्या दरम्यान नागपूर टुडेचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या आईची मुलीची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या उमरेड रोड परिसरात एका महिलेचा आणि तिच्या नातीचा मृतदेह पोलिसांना सापडला. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटवण्यात आली असून हे मृतदेह रविकांत कांबळे यांच्या आई आणि मुलीचेच आहेत.

नागपूर टुडे या वेब पोर्टलचे क्राइम रिपोर्टर रविकांत कांबळे यांची आई आणि मुलगी कालपासून बेपत्ता होत्या. त्यांचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या दोघींचे अपहरण करुन त्यांची हत्या केली गेली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. उषा सेवकदास कांबळे असे रविकांत कांबळे यांच्या आईचे नाव आहे. राशी रविकांत कांबळे हे त्यांच्या मुलीचे नाव आहे. शनिवारी संध्याकाळपासून या दोघीही बेपत्ता होत्या. त्यानुसार रविकांत कांबळे यांनी पोलिसांत त्या दोघी हरवल्याची तक्रारही दाखल केली होती. तसेच फेसबुकवरही रविवारी सकाळी या दोघींचा फोटो पोस्ट केला होता. a

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages