Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पालिकेच्या दवाखान्यांमध्ये विविध प्रकारच्या चाचण्या होणार


मुंबई । प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेच्या दवाखान्यांमधून चाचण्यांची सुविधा नव्हती. त्यामुळे रुग्णांना बाहेरून खासगीरित्या चाचण्या करून घ्याव्या लागत होत्या. आता महापालिकेच्या रुग्णालयांमधून विविध प्रकारच्या चाचण्या करण्याच्या मागणी पालिका सभागृहाने मंजुर केली आहे. पालिकेच्या दवाखान्यात विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार असल्याने करदात्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

नॅशनल हेल्थ अर्बन मिशनच्या सर्वेक्षणानुसार मुंबईत १५ हजार नागरिकांकरिता एक दवाखाना आवश्यक आहे. मात्र सध्या ५० हजार नागरिकांकरिता एक दवाखाना आहे. महापालिकेच्या दवाखान्यांची जागा रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी नसल्यामुळे तेथे सर्व रुग्णांची तपासणी करणे तसेच चिकीत्सालयीन तपासण्या करणे शक्य होत नाही. नागरिकांना महापालिकेच्या रुग्णालयात किंवा खासगी प्रयोगशाळांमधून तपासण्या करून घ्याव्या लागतात. महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आरोग्य तपासणी, प्रथमोपचार, याचबरोबर रक्त तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी इत्यादी सुविधा आवश्यक आहेत, मात्र सध्या या सुविधा उपलब्ध नाहीत. जास्तीत जास्त नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ घेता यावा म्हणून व महापालिकेच्या सर्वसाधारण रुग्णालयावरील भार कमी करता यावा म्हणून महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये आरोग्य तपासणी, प्रथमोपचार, याचबरोबर रक्त तपासणी, एक्सरे, सोनोग्राफी इत्यादी चाचण्या करण्याबाबतच्या सुविधा द्याव्यात अशी मागणी जावेद जुनेजा यांनी केली होती. जुनेजा यांची ठरावाची सूचना पालिका सभागृहात मंजूर झाली आहे. पालिका दवाखान्यात विविध चाचण्या केल्या जाणार असल्याने नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom