एकाच वाहनातून ओल्या व सुक्या कचऱ्याची वाहतूक होणार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

18 February 2018

एकाच वाहनातून ओल्या व सुक्या कचऱ्याची वाहतूक होणार


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबई महापालिकेने ओला आणि सुका कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे सक्तीचे केले आहे. नागरिकांवर कचऱ्याचे वर्गीकरण करणे सक्तीचे केले जात असताना महापालिकेकडून मात्र नागरिकांनी वर्गीकरण केलेले कचरा पुन्हा एकत्र करून डम्पिंग ग्राऊंडवर नेला जात होता. त्यामुळे पालिकेवर टिका होत होती. पालिकेवर होणारी टिका बंद करण्यासाठी पुढील सात वर्षांसाठी देण्यात येणाऱ्या कचरा वाहून नेण्याच्या कंत्राटात ओला कचरा वाहून नेणाऱ्या वाहनांतच सुका आणि ई कचऱ्यासाठी १० टक्के जागा राखीव ठेवण्याबाबतचा येईल, असा निर्णय पालिकेने घेतला आहे. 

मुंबईत ओला व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरणा ची अमलबजावणी काटेकोरपणे करण्यासाठी पालिकेने पाऊल उचलले आहे. सुक्या कचऱ्यासोबच इलेक्ट्रॉनिक कचरा जमा करण्यासाठी वाहनात स्वतंत्र रचना करण्यात येईल. प्रत्येक सोसायटीला या कचऱ्याचं वर्गीकरण करण्याचे आदेश देतानाच हा सुका कचरा स्वतंत्रपणे वाहून नेण्यासाठी महापालिकेने विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. यासाठी सुरुवातीला ४६ वाहने पुरवण्यात आली होती. ही संख्या आता ९४ पर्यंत नेण्यात आली आहे. या वाहनांमधून आतापर्यंत सुका कचरा स्वतंत्रपणे सोसायटींमधून जमा करून वाहून नेला जात होता. पण नव्याने सात वर्षांसाठी मागवलेल्या निविदांमधील कंत्राटात सुका कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रथम लहान आणि मोठ्या कॉम्पॅक्टर्समध्ये त्या वाहनांच्या आकारमानाच्या ९० टक्के जागा ओल्या कचऱ्यासाठी तर सुका कचरा आणि इलेक्ट्रॉनिक कचरा गोळा करण्यासाठी १० टक्के एवढी जागा कप्पा करून ठेवण्यात येईल, अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळे
प्रत्येक इमारतीचा सुका आणि ओला कचरा एकत्र न होता एकाच वाहनातून वेगवेगळा वाहून नेण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे नागरिकांना कचरा वर्गीकरणाची सवय लागेल शिवाय डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा वाहून नेण्याचा भार कमी होईल, अशाप्रकारचे नियोजन पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने केला आहे. कचरा गोळा करून वाहून नेण्याच्या नवीन एम. एस. डब्ल्यू कंत्राटामध्ये प्रथमच सुका कचरा आणि ई कचऱ्याकरता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याचं महापालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. मुंबईत सुक्या कचऱ्यासोबत ई-कचऱ्याचीही मोठी समस्या आहे. पण आता सुक्या कचऱ्यासोबत ई कचराही रोज वाहून नेण्यात येणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

१० टक्के राखीव कप्पा -
मोठे कॉम्पॅक्टर्स -
एकूण ६ मेट्रिक टन कचरा
साईट लोडिंग कॉम्पॅक्टर्स - एकूण ६ मेट्रिक टन कचरा
लहान कॉम्पॅक्टर्स - एकूण २.५ मेट्रिक टन कचरा
लहान बंद वाहने - एकूण ०.६ मेट्रिक टन कचरा

Post Top Ad

test