व्यावसायिक गॅस सिलिंडर वितरणात काळाबाजार - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

18 February 2018

व्यावसायिक गॅस सिलिंडर वितरणात काळाबाजार


योग्य तपासणी होत नसल्याने आगीच्या घटना -
मुंबई | प्रतिनिधी -
काळ्या बाजारात वस्तू विकून नफा कमवला जातो. असाच प्रकार व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वितरणातही केला जात आहे. मुंबईतील हॉटेल, टपऱ्यावर नियम धाब्यावर बसवून कोणतीही खातरजमा न करता, पुरावे न तपासातच गॅस सिलिंडरचे वितरण केले जाते. त्याचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. सबंधित यंत्रणाकडून याची तपासणी योग्य प्रकारे होत नसल्याने आगी सारख्या जीवघेण्या घटना घडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

मुंबई, ठाण्यात 200 च्या आसपास गॅस एजन्सी असून महिन्याला सुमारे 25 लाख सिलिंडरचा पुरवठा केला जातो. घरगुती सिलिंडर जोडण्या देताना एजन्सीकडून आवश्यक पुरावे घेतले जातात. मात्र व्यावसायिक सिलिंडर देताना काही गॅस एजन्सी पुरावे तपासण्याच्या भान गडीत न पड़ता सबंधित ग्राहकाला वितरित करतात. ग्राहक कुठे राहतो, सिलिंडरचा वापर कशासाठी करणार आहे, त्याच्याकडे आवश्यक परवानग्या आहेत की नाहीत याची कोणतीही खातरजमा केली जात नाही. पैसे मोजले की पाहिजे तेवढे व्यावसायिक सिलिंडर वितरण होत असल्याने असे सिलिंडर हॉटेल, फुटपाथ, रस्त्याच्या चौकातून असुरक्षितपणे वापरण्यात येत आहेत. काही हॉटेल मालकाकडून हॉटेलच्या गच्चीतल्या कोपऱ्यात किंवा अनधिकृतपणे उभारलेल्या पोट माळ्यावरील एकावर एक कोम्बून ठेवण्यात येतात. पालिकेने मुंबईत केलेल्या हॉटेलांच्या तपासणीत हा प्रकार उघड झाला होता. काही हॉटेल चालकाकडून घरगुती सिलिंडरचाही वापर केला जातो. यामध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार होतो, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. अन्न व् नागरी पुरवठा विभाग, पोलिस, सबंधित कंपन्या यांच्याकडून नियमित तपासण्या होत नाहीत. वरवरच्या तपासण्या होत असल्याने नियम धाब्यावर बसवणाऱ्यांचे फावले आहे. मुंबई महापालिकेच्या धड़क मोहिमेत बेकायदा वापरात असलेले सिलिंडर जप्त करण्यात आले. सिलिंडर वापराच्या नियमात ऐसी तैशी होत असल्यानेच सिलिंडर स्फोट होत असल्याच्या घटना घड़तात, अशी कबुली पालिकेच्या एका अधिकाऱ्याने दिली.

Post Top Ad

test