आवश्यकता असल्यास कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ - विनोद तावडे - JPN NEWS - www.jpnnews.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

15 March 2018

आवश्यकता असल्यास कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ - विनोद तावडे


मुंबई, दि. 15 : कोकणासाठी अस्मिता म्हणून नव्हे तर शैक्षणिकदृष्ट्या कोकणात स्वतंत्र विद्यापीठ हवे असल्यास याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल. यासंदर्भात सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन आवश्यक तो निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

नियम 92 अन्वये सदस्य ॲड.निरंजन डावखरे यांनी कोकणाला स्वतंत्र विद्यापीठ हवे याबाबत अर्धा तास चर्चा उपस्थित केली होती. या चर्चेला उत्तर देताना तावडे पुढे म्हणाले,कोकणातील विद्यार्थ्यांना विविध कामासाठी मुंबई येथील विद्यापीठात यावे लागू नये यासाठी विविध प्रशासकीय प्रक्रिया ऑनलाईन केल्या आहेत. मुंबई विद्यापीठाचे जगभरातील स्थान विचारात घेता कोकणातील विद्यार्थ्यांना या विद्यापीठापासून वेगळे होणे कितपत योग्य आहे याबाबतही विचार होणे गरजेचे आहे. तथापि विद्यार्थ्यांच्या हितासाठी सर्व संबंधित लोकप्रतिनीधींची बैठक लवकरच घेऊ, असेही त्यांनी सांगितले. या चर्चेत सदस्य विक्रम काळे यांनी सहभाग घेतला.

Post Top Ad

test
test