शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा समाज कल्याण कार्यालयावर आक्रोश मोर्चा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

शिष्यवृत्तीसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा समाज कल्याण कार्यालयावर आक्रोश मोर्चा

Share This

मुंबई - मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती गेली दोन वर्षात जमा न झाल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने सम्यक विद्यार्थी आंदोलन या संघटनेच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले. चेंबूर येथील बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून शेकडो विद्यार्थ्यांनी चेंबूर समाज कल्याण कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

१८६८ कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा झाला असल्याचा आरोप यावेळी विद्यार्थी संघटनांनी केला आहे. गेली दोन वर्ष झाले तरी या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती जमा झालेली नाही. त्यामुळे महाविद्यालय या विद्यार्थ्यांना महाविद्यालय फी भरण्याची सक्ती करत आहे. फी न भरल्यास परीक्षेचे फॉर्म भरून घेतले जाणार नाहीत असेही महाविद्यालय प्रशासनाने सांगितले आहे. निकालपत्र रोखून धरणे, परीक्षेस बसू न देणे, ७५ टक्के हजेरीची सक्ती करणे असे प्रकार महाविद्यालयात होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागावर हा मोर्चा काढला. आठ दिवसात शिष्यवृत्ती जमा झाली नाही तर २६ मार्चला राज्यभरातील विद्यार्थी विधिमंडळावर मोर्चा काढतील, असा इशाराही यावेळी विद्यार्थी संघटनांनी दिला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages