Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

पालिका रुग्णालयांत स्पेशल बर्थ डिफेक्ट क्लिनिक सुरु होणार


मुंबई । प्रतिनिधी - जन्मजात दोष असणा-या बालकांवर तातडीने उपचार सुरू करुन बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी महापालिका रुग्णालयांत स्पेशल बर्थ डिफेक्ट क्लिनिक सुरू करण्यात येणार आहे. त्या करीता न्यूरो सर्जन व तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. तत्कालीन नगरसेविका अनुराधा पेडणेकर यांच्या ठरावाच्या सूचनेला पालिका आयुक्तांनी सकारात्मक अभिप्राय दिला आहे.

जवळच्या नात्यात लग्न, अनुवंशिक दोष अशा कारणांमुळे जन्मणा-या अपत्यात दोष असण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यांत नवजात अर्भकाची सर्वसाधारण वाढ नीट न होणे, मेंदूची वाढ नीट न होणे, अर्भक गतीमंद असणे, हृदयात दोष , हाडांची वाढ न होणे आदी अनेक दोषांचा समावेश असतो. अशा प्रकारच्या दोषांवर तात्काळ शस्त्रक्रिया, योग्य उपचार न झाल्यास मूल दगावण्याची शक्यता असते. यासाठी महापालिकेच्या प्रमुख व इतर रुग्णालयांत प्रायोगिक तत्वावर स्पेशल बर्थ डिफेक्ट क्लिनिक सुरु करून अशा क्लिनिकमध्ये बालरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, न्यूरो सर्जन व इतर तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी व बालमृत्यूचे प्रमाण कमी करावे अशी मागणी ठरावाच्या सूचनेव्दारे तत्कालीन नगरसेविका डॉ. अनुराधा पे़डणेकर यांनी मांडली होती. या सूचनेला पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी मंजुरी दिली आहे. अशा प्रकारचे उपचार केईएम, व शीव येथील लोकमान्य़ टिळक रुग्णालयांत सुरु झाले आहे. मात्र इतर रुग्णालयांतही असे क्लिनिक सुरु करून तेथे त्यासंबंधित तज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. त्यामुळे आता लवकरच केईएम व लोकमान्य टिळक रुग्णालयांप्रमाणे पालिकेच्या इतर रुग्णालय़ांतही अशा प्रकारचे क्लिनिक सुरु होणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom