मुंबई विद्यापीठात जयंती सप्ताहाचे आयोजन

JPN NEWS

मुंबई - मुंबई विद्यापीठाने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ९ ते १४ एप्रिल दरम्यान जयंती सप्ताहाचे आयोजन केले आहे. या सप्ताहामध्ये वैचारिक, शैक्षणिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार असल्याचे फुले-आंबेडकर जयंती सप्ताहाचे समन्वयक डॉ. गौतम गवळी यांनी सांगितले. 

सोमवारी ९ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजता डॉ. आंबेडकर भवन पासून ते जवाहरलाल नेहरू ग्रंथालयापर्यंत संविधान रॅली निघणार आहे. यानंतर महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील ग्रंथ व छायाचित्रांच्या प्रदर्शनाने या जयंती सप्ताहास सुरुवात होईल. याचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्राध्यापक झहीर अली यांचे सामाजिक न्यायाची आंबेडकरी संकल्पना या विषयावर उद्घाटनपर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे हे असतील. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, विद्यापीठाच्या मानव्य शाखेचे अधिष्ठाता डॉ. एम. एस. कुऱ्हाडे व कुलसचिव डॉ. दिनेश कांबळे हे उपस्थित राहणार आहेत.
Tags