Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

'भारतीय संविधानाचे युनिक कार्ड'च्या माध्यमातून जनजागृती


मुंबईसह महाराष्ट्रात गरिबांना स्वस्त दरात घरे उपलब्ध करून देणाऱ्या आरजू (शेलटरिंग होप) या संस्थेने 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त 'भारतीय संविधानाचे युनिक कार्ड' बनवले आहे. या कार्डमध्ये भारतीय संविधानाची तसेच माहिती अधिकाराची (आरटीआयची) संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. या कार्डमधील माहितीच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या मूलभूत अधिकारांबाबत जनजागृती केली जाणार आहे. वर्षभरात 50 हजार लोकांपर्यंत हे कार्ड पोहचवण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. याची सुरुवात संस्थेचे चेयरमन राजेंद्र मेहता यांच्या हस्ते नुकतीच झाली आहे.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom