Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

आमदार खासदारांची मुलं नगरसेवक निधी खर्च करण्यात पिछाडीवर


मुंबई । जेपीएन न्यूज टीम -
राजकारणातील पदे आपल्याच घरात राहावी म्हणून मुलं, मुली, पत्नी, सुन इत्यादी नातेवाईकांना पुढे करून नगरसेवक, आमदार, खासदार बनवले जाते. मात्र असे धरून बांधून बनवलेले लोकप्रतिनिधी राजकरणात यशस्वी होतातच असे नाही. मुंबई महापालिकेत असेच अनेक नगरसेवक आहेत ज्यांना आपल्या घरातील कोणाच्या तरी आशिर्वादाने किंवा वशिल्याने पद मिळाले आहे. मात्र कामाचा अनुभव नसल्याने त्यांना नागरिकांना सोयी सुविधा मिळवून देण्यास अपयश येते. असाच प्रकार घडला आहे मुंबई महापालिकेत असलेल्या आमदार खासदारांची मुलं असलेल्या नगरसेवकांबाबत. आमदार खासदारांची मुलं नगरसेवक झाली मात्र आपल्या विभागात त्यांना नगरसेवक निधी खर्चच करता आलेला न

मुंबई महापालिकेकडून प्रत्येक नगरसेवकाला विकासकामासांठी ६० लाख रुपयांचा नगरसेवक निधी मिळतो. त्याशिवाय विकास निधी, महापौरांच्या माध्यमातून सर्व पक्षांना वाटप केल्या नेणाऱ्या निधी मधील काही भाग प्रत्येक नगरसेवकाला मिळतो. स्थायी समिती म्हणून नेमणूक झालेल्या सदस्यांना वेगळा निधी मिळतो. हा सर्व निधी मिळवून एका नगरसेवकाला दोन ते अडीच कोटी रुपयांचा निधी मिळतो. या निधीमधून नगरसेवकांना आपल्या विभागात कामे करायची असतात. गेल्यावर्षी २२७ निवडून आणलेल्या व ५ नामनिर्देशित अशा एकूण २३२ नगरसेवकांना नगरसेवक निधी म्हणून १३९ कोटीं रुपयांची तरतूद केली होती. परंतु, यामधील ११४ कोटी रुपये नगरसेवक निधी खर्च करण्यात आला असून २५ कोटी रुपयांचा निधी खर्च न केल्याने वाया गेला आहे. गेल्या आर्थिक वर्षात पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्याने अर्थसंकल्प उशीरा मंजूर झाला. महिनाभराहून अधिक काळ पालिकेची सॅप प्रणाली बंद होती. यामुळे नगरसेवकांची कामे होत नसल्याची तक्रार अनेक नगरसेवकांनी केली होती. आपला निधी खर्च करण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी वाढवून देण्याची मागणी नगसरेवकांनी केली होती मात्र ही मागणी पालिका आयुक्तांनी धुडकावून लावली होती.

पालिकेकडून मिळालेल्या नगरसेवक निधीचा वापर करण्यात पहिल्या १० मध्ये भाजपाच्या ६ नगरसेवकांचा समावेश आहे. शिवसनेच्या दोन. काँग्रेसच्या एक तर समाजवादी पक्षाच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. तर नगरसेवक निधी कमी वापरणाऱ्यांमध्ये महापालिका कर्मचारी म्हणून प्रशासनाचा अनुभव असलेल्या आणि महिला व बालविकास समितीच्या अध्यक्षपद भूषवलेल्या सिंधु मसुरकर यांचा क्रमांक लागतो. त्यांच्यानंतर शिवसनेच्या ऋतुजा तारी, भाजपाचे आमदार राज पुरोहित याचे पुत्र आकाश पुरोहित, खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र निल सोमय्या इत्यादींचा समावेश आहे. नगरसेवक निधी म्हणून मिळालेल्या ६० लाखाच्या निधी पैकी सिंधू मसुरकर यांना २७ लाखाचा निधी खर्च करता आला आहे. राज पुरोहित यांना ३० लाख तर निल सोमय्या यांना ३६ लाखाचा निधी खर्च करता आला आहे. एकीकडे निधी खर्च करण्यात आमदार खासदारांची मुलं पिछाडीवर पडली असली तरी त्याला माजी आमदार विनोद घोसाळकर यांची सून तेजस्वी घोसाळकर अपवाद ठरल्या आहेत. त्यांनी ६० लाखांपैकी ५६ लाख रुपयांचा नगरसेवक निधी खर्च केला आहे. 

निधी जास्त वापर करणारे नगरसेवक -
राजेंद्र नरवणकर (काँग्रेस) - ६० लाख
प्रिती सातम (भाजपा) - ५९ लाख रुपये
प्रियंका मोरे (भाजपा) - ५८ लाख रुपये
श्रीकला पिल्ले (भाजपा) - ५८ लाख रुपये
अनिता पांचाळ (भाजपा) - ५८ लाख रुपये
निधी शिंदे (शिवसेना) - ५७ लाख रुपये
तेजस्वी घोसाळकर (शिवसेना) - ५६ लाख रुपये
हेतल गाला (भाजपा) - ५६ लाख रुपये
आयेशा शेख (सपा) - ५६ लाख रुपये
मुरजी पटेल (भाजपा) - ५५ लाख रुपये

निधी कमी वापर करणारे नगरसेवक -
सिंधुताई मसुरकर (शिवसेना) - २७ लाख रुपये
ऋतुजा तारी (शिवसेना) - २९ लाख रुपये
आकाश पुरोहित (भाजपा) - ३० लाख रुपये
आयेशा बानो (सपा) - ३० लाख रुपये
अंजली खेडकर (भाजपा) - ३५ लाख रुपये
निल सोमय्या (भाजपा) - ३६ लाख रुपये
रिटा मकवाना (भाजपा) - ३६ लाख रुपये
सुनिता मेहता (भाजपा) - ३७ लाख रुपये

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom