Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

गोरेगांव आग - मृतांची संख्या 5 वर


मुंबई - गोरेगाव पश्चिम येथील एस.व्ही .रोडवर असलेल्या टेक्निक प्लस इमारतीला रविवारी आग लागली होती. मंगळवारी सकाळी या इमारतीमध्ये एक मृतदेह मिळाल्याने आगीमधील मृतांची संख्या 5 झाली आहे.

गोरेगाव पश्चिम येथील एमटीएनएल ऑफिसजवळील पवनबाग येथे असलेल्या टेक्निक प्लस या 12 मजली व्यावसायिक इमारतीच्या 7 व्या मजल्यावर काल सायंकाळी 4 वाजून 24 मिनिटांनी भीषण आग लागून यात नैमुद्दीन शेख (25), रामअवतार (45), रामतीर्थ पाल (45) या तिघांचा मृत्यू झाला. तर या घटनेत अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांसह 9 जण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी गोरेगाव येथील सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले काहींना उपचारानंतर लगेच सोडून देण्यात आले. दरम्यान, उपचारादरम्यान सोमवारी सकाळी 9 च्या सुमारास शमशहादा शहा (24) याचा मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील बळींची संख्या 4 झाली होती. दरम्यान मंगळवारी 7 व्या मजल्यावर इलेक्ट्रिक कॅबिनमध्ये एक मृतदेह आढळून आला. सिद्धार्थ रुग्णालयाने त्याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. त्याचे नाव अब्दुल रशीद खान (22) असे आहे. रविवारी आग लागली त्यावेळी आगीपासून बचाव करण्यासाठी तो इलेक्ट्रिक कॅबीनच्या आता लपला असावा असे सांगण्यात येत आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom