मुंबई - मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये सायडिंगला उभ्या असलेल्या एका डब्याला मंगळवारी दुपारी आग लागली. ही आग अग्निशमन दलाच्या जवानांनी सव्वा तासाने विझवली.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे प्लॅटफॉर्म क्रमांक १० जवळ उभ्या असलेल्या मेलच्या डब्याला आज दुपारी ३ वाजता अचानक आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी ४ फायर इंजिन आणि ४ वॉटर टँकरच्या सहाय्याने सव्वा तासाने ४ वाजून २० मिनिटांनी नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले असले तरी तो पर्यंत आगीमध्ये डब्बा जाळून खाक झाला होता. दरम्यान फॉरेन्सिक विभागाच्या अहवालानंतर ही आग नेमकी कशी लागली हे स्पष्ट होईल असे रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक संजयकुमार जैन यांनी पत्रकारांना सांगितले.