झाड पडून एकाचा मृत्यू. चार जखमी - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

24 June 2018

झाड पडून एकाचा मृत्यू. चार जखमी


मुंबई - मुंबईत मुसळधार पावसामुळे मेट्रो सीनेमागृहाजवळ झाड अंगावर पडून एकाचा मृत्यू तर 4 जण जखमी झाले. जखमींना जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मुंबईत दुपारपासून जोरदार पावसामुळे मुंबई उपनगरात झाडे 17 हुन अधिक ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मेट्रो सिनेमागृहाजवळ, एमजी मार्गावर अंगावर झाड पडल्याने बारसिंग( 60) या व्यक्तीचा मृत्यू झाला. तर सिंग (60) (गंभीर), संतोष सिंग (28), राम विलास सोनी (55),  सलीम उद्दीन शेख (48) हे चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Post Top Ad

test