मुंबईत 591 किलो प्लास्टिक जप्त, 3 लाख 35 हजार रुपयांचा दंड वसूल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मुंबईत 591 किलो प्लास्टिक जप्त, 3 लाख 35 हजार रुपयांचा दंड वसूल

Share This

मुंबई - पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लास्टिक बंदीच्या अमलबजावणीला शनिवारपासून मुंबईसह राज्यभरात सुरुवात झाली आहे. रविवारी प्लास्टिक विरोधी पथकाने मुंबईतील चेंबूर मधील 867 दुकानांची तपासणी केली. यांत 72 दुकानातील 591. 67 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 3 लाख 35 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. सोमवारपासून व्यापक कारवाईचा धडाका सुरू केला जाणार असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त संगीता हसनाळे यांनी दिली.

प्लास्टिक बंदीच्या अमलबजावणीला सुरवात झाल्या नंतर मुंबई महापालिकेने पहिले दोन दिवस जनजागृतीवर भर दिला. शनिवारी दिवसभर जनजागृती केल्यानंतर रात्री उशीरा शहरातील मॉलना लक्ष्य केले. पहिल्या दिवशी तब्बल 54 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. रविवारी प्लास्टिक विरोधी पथकाने मॉल, दुकानांवर लक्ष्य करीत प्लास्टिकची झाडाझडती घेतली. दिवसभरात 867 दुकानांची तपासणी केली. यामध्ये प्लास्टिक आढळलेल्या 72 दुकानातील केलेल्या कारवाईत 3 लाख 35 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. तर 591. 67 किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक आयुक्त संगीता हंसनाळे यांनी दिली. दरम्यान, सोमवारपासून प्लास्टिक पिशवी आढळल्यास 'सक्त वसुली' करणार असल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. यामध्ये बडे व्यापारी-आस्थापने रडारवर राहणार असून सर्वसामान्यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. यावेळी दंडाची रक्कम भरण्यास नकार दिल्यास पोलीस कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages