पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती - JPN NEWS.in

Breaking

Post Top Ad

test

Post Top Ad

test

30 June 2018

पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती


मुंबई - मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी सुबोध जयस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर पोलीस महासंचालक म्हणून दत्ता पडसलगीकर यांची नियुक्ती करण्यात आली नियुक्तीनंतर लगेचच पडसलगीकर व जयस्वाल यांनी पदभार स्वीकारला आहे. पडसलगीकर यांनी सतीश माथुर यांच्याकडून सूत्रे स्वीकारली.

महाराष्ट्र केडरचे १९८५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले सुबोध जयस्वाल यांना रॉ या भारतीय गुप्तचर यंत्रणेमध्ये प्रतिनियुक्तीवर बोलावण्यात आले होते. जयस्वाल यांनी मुंबई पोलीस दलात अतिरिक्त आयुक्त म्हणून याआधी सूत्रे सांभाळलेली आहेत. देशभरात गाजलेल्या तेलगी स्टॅम्प पेपर घोटाळ्याच्या तपासातही जयस्वाल यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. २००६ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा तपासही जयस्वाल यांनी हाताळला होता. २०१६ मध्ये पडसलगीकर यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली होती. जावेद अहमद यांच्याकडून मुंबईचे ४०वे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी सूत्रे स्वीकारली होती. त्याआधी सुमारे १० वर्षे आयबीमध्ये त्यांनी सेवा बजावली. पडसलगीकर हे १९८२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलीस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल त्यांना राष्ट्रपती पदकानेही सन्मानित करण्यात आले आहे. 

Post Top Ad

test